England vs India 5th Test Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हलवर सुरु असलेल्या निर्णायक कसोटी सामन्यात एक भन्नाट घटना घडली. टीम इंडियाने इंग्लंडसमोर 374 धावांचे लक्ष्य ठेवले आहे, पण जडेजा फलंदाजी करत असताना स्टेडियममध्ये एक मजेशीर प्रसंग पाहायला मिळाला, ज्यामुळे एका चाहत्याला चक्क LIVE सामन्यातच आपले कपडे बदलावे लागले.

जडेजाने थेट अंपायरकडे केली तक्रार

रवींद्र जडेजा मैदानावर जबरदस्त फलंदाजी करत होता. त्याचवेळी समोरच्या स्टँडमध्ये बसलेल्या एका व्यक्तीची लाल रंगाची टी-शर्ट त्याच्या डोळ्यांपुढे वारंवार येत होती, जी त्याच्या एकाग्रतेत अडथळा ठरत होती. जडेजाने ही गोष्ट थेट अंपायरच्या निदर्शनास आणून दिली.

प्रेक्षकाने सीट बदलण्यास नकार दिला… मग?

अंपायरने त्या व्यक्तीला सीट बदलण्यास सांगितले, मात्र त्याने नकार दिला. मग आयोजकांनी त्याला ग्रे रंगाचा टी-शर्ट दिला आणि त्याने ती जाग्यावरच पटकट घालून घेतला. त्यानंतर जडेजा पुन्हा फलंदाजीला लागला. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

जडेजा म्हणजे केवळ अष्टपैलू नव्हे, तर गेम चेंजर!

दुसऱ्या डावात जडेजाने 77 चेंडूंमध्ये 53 धावा करत भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले. संपूर्ण मालिकेत त्याचा फॉर्म तुफान आहे, 10 डावांत त्याने 86 च्या सरासरीने 516 धावा केल्या आहेत. त्यात 47 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे. याशिवाय त्याने गोलंदाजीत 5 सामन्यांत 7 विकेटही घेतल्या आहेत.

सामन्याबद्दल बोलयचे झाले तर,  तिसऱ्या दिवसअखेर भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी 374 धावांचे लक्ष्य ठेवले असून इंग्लंडने 1 गडी गमावत 50 धावा केल्या आहेत. आता भारताला विजयासाठी केवळ 9 गडी, तर इंग्लंडला विजयासाठी 324 धावांची गरज आहे. दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर मोहम्मद सिराजने इंग्लंडचा ओपनर झॅक क्रॉली (14) ला बोल्ड करत मोठं यश मिळवलं. दुसरा ओपनर बेन डकेट 34 धावांवर नाबाद आहे. विशेष म्हणजे इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज क्रिस वोक्स पहिल्या दिवशी जखमी झाला आणि तेव्हापासून मैदानावर दिसलेले नाहीत. त्यांनी पहिल्या डावात फलंदाजीही केली नाही. त्यांच्या दुसऱ्या डावातही खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भारताला प्रत्यक्षात फक्त 8 गडी बाद करावे लागतील.

पावसाची शक्यता लक्षात घेता, लंचपूर्वीच 3-4 गडी बाद करणं भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. एकदा इंग्लंडचा टॉप ऑर्डर कोसळला, तर उर्वरित फलंदाजांवर दबाव निर्माण होईल आणि भारताचा विजय सोपा होईल.

हे ही वाचा - 

Eng vs Ind 5th Test 3th Day Stumps : तिसऱ्या दिवशी जैस्वाल-आकाशदीप-जडेजा-सुंदर चमकले, आता टीम इंडियाची मदार गोलंदाजांच्या हाती, जिंकण्यापासून 9 विकेट दूर