Sara Tendulkar-Arjun Tendulkar : देशभरात आज भावंडांच्या नात्याचा पवित्र सण ‘राखी पौर्णिमा’ साजरी होत आहे. या खास दिवशी माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा तेंडुलकरने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकताच चाहत्यांमध्ये तो वेगाने व्हायरल झाला. या रीलमध्ये सारा सोबत तिचा भाऊ आणि क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरही दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून हसू येईल, असा एक वेगळाच प्रयोग साराने या व्हिडिओत अर्जुनकडून करून घेतला.
साराने अर्जुनकडून करून घेतला हा खास ‘टास्क’
भाऊ आणि बहिणीच्या अतूट बंधनाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन यावेळी सारा आणि अर्जुनने त्यांच्या खास शैलीत साजरा केला. साराने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अर्जुन मेकअप आर्टिस्टच्या भूमिकेत दिसत होता. व्हिडिओमध्ये साराने अर्जुनने तिचा मेकअप केला. मेकअप ब्रश आणि लिपस्टिकपासून ते आयलाइनरपर्यंत अर्जुनने साराचा मेकअप केला. अर्जुनच्या या ‘आर्टिस्ट्री’चे परिणाम पाहून चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश फोटो आणि रीलसाठी ओळखली जाते. पण यावेळी ती तिचा भाऊ अर्जुनसोबतच्या या मजेदार व्हिडिओद्वारे चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये दोघांमधील विनोद आणि प्रेमळ नाते स्पष्टपणे दिसून आले. व्हिडिओमध्ये सारा अर्जुनला हसताना आणि मेकअप टिप्स देताना दिसत आहे, तर अर्जुन त्याच्या प्रयत्नांमध्ये काही चुका देखील करतो, ज्यामुळे हा रील आणखी मजेदार बनतो. साराने या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, Happy Rakshabandhan from this chaotic duo...'
सोशल मीडियावर खूप चर्चेत
सारा तेंडुलकर तिच्या स्टायलिश फोटोंसाठी आणि रील्ससाठी प्रसिद्ध आहे. फॅशन असो, प्रवास असो किंवा कुटुंबासोबतचे क्षण तिच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं जातं. तर दुसरीकडे अर्जुन आपला क्रिकेट करिअर घडवण्यात व्यस्त आहे. अलीकडेच साराला ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन क्षेत्राचा प्रचार करण्याची जबाबदारीही मिळाली असून ती ती उत्तम प्रकारे पार पाडत आहे.
हे ही वाचा -