Mohammed Siraj-Virat Kohli : घरी निवांत फोनमध्ये रमलेला मोहम्मद सिराज, तरी सोशल मीडियावर ट्रेंड झाला, कारण ठरलं कोपऱ्यातील फोटो

Virat Kohli Test Jersey Mohammed Siraj Home Wall : मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत धुमाकूळ घातला.

Virat Kohli Test Jersey Mohammed Siraj Home Wall

1/8
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत धुमाकूळ घातला.
2/8
सिराजने या मालिकेत एकूण 23 विकेट घेतले.
3/8
इतकेच नाही तर मोहम्मद सिराज या मालिकेत सर्वाधिक षटके टाकणारा गोलंदाजही आहे.
4/8
त्याने पाच सामन्यांमध्ये एकूण 185.3 षटके टाकली, ज्यामध्ये दोनदा पाच बळी घेण्याचाही समावेश आहे.
5/8
दरम्यान, मोहम्मद सिराजचा घरी निवांत फोन बघत बसला फोटो व्हायरल होत आहे, ज्यामुळे विराट कोहली पण ट्रेंड होते आहे.
6/8
खरंतर, सिडनी कसोटीनंतर विराट कोहलीने आपली स्वाक्षरी असलेली जर्सी मोहम्मद सिराजला भेट दिली होती.
7/8
हा सामना कोहलीच्या टेस्ट कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला होता.
8/8
शनिवारी (9 ऑगस्ट) सिराजच्या घराच्या भिंतीवर फ्रेम करून लावलेली ही जर्सी सोशल मीडियावर व्हायरल झाली.
Sponsored Links by Taboola