IND vs SA T20 Series : ऑस्ट्रेलियाला टी20 मालिकेत मात दिल्यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी (IND vs SA) तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. आगामी टी20 वर्ल्डकपसाठी ही मालिका महत्त्वाची असल्याने भारतीय संघात नेमकी कोणाला संधी मिळणार हे देखील महत्त्वाचं आहे. दरम्यान हार्दीक पंड्याला विश्वचषकासाठी विश्रांती देण्याकरता संघाबाहेर ठेवलं असून त्याच्याजागी कोणाला संधी मिळेल हा प्रश्न सर्वांना पडला आहे. शाहबाज अहमद या अष्टपैलू खेळाडूला संधी देण्याची अधिक चर्चा असून भारताचे बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी श्रेयस, अर्शदीप, शाहबाज अशा नेमक्या कोणाला संधी मिळणार याबद्दल सामन्यादिवशीच कळेल असं वक्तव्य केलं आहे.


भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. पण भारताला विश्वचषकात आणखी चांगली कामगिरी करुन विजय मिळवायचा असल्यास कोणतीच कमतरता संघात ठेवता कामा नये. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारत अशाच खेळाडूंना संधी देईल ज्यांना विश्वचषकात संधी मिळणार आहे. त्यांचा सराव होण्याकरता ही मालिका महत्त्वाची आहे. त्यामुळे अंतिम 11 मध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहावं लागेल.






भारतीय


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 7 द्विपक्षीय टी-20 मालिका खेळली गेली. यापैकी भारतानं तीन मालिका जिंकल्या आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दोन मालिकेत विजय मिळवता आलाय. यातील दोन मालिका अनिर्णित ठरल्या आहेत. 


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, शाहबाज अहमद.


भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ:
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, रिसोबा, रिसोबा रुसो, तबरीझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.


हे देखील वाचा-