India vs Sri Lanka Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यात टी20 मालिका पार पडल्यानंतर आता एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. भारतीय संघाचा टी20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवल्यानंतर आता एकदिवसीय मालिका सज्ज करण्याचा हेतू आहे. दरम्यान या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात होत असून आज पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. विशेष म्हणजे टी20 मालिकेत विश्रांतीवर असलेले रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज आज एकदिवसीय संघातून टीम इंडियामध्ये पुनरागमन करत आहेत. त्यात आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीनेही हा सामना महत्त्वाचा असल्याने सर्वांचे लक्ष या सामन्याकडे असणार आहे. तर आजच्या या सामन्याची माहिती जाणून घेऊ...


कधी होणार सामना?


भारत विरुद्ध श्रीलंका हा पहिला एकदिवसीय आज अर्थात 10 जानेवारी रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. 


कुठे आहे सामना?


आजचा भारत विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना गुवाहाटीच्या बरसापरा क्रिकेट स्टेडियमवर (Baraspara Stadium) खेळवला जाणार आहे.  


कुठे पाहता येणार सामना?


भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   


भारताचा एकदिवसीय संघ:


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.


श्रीलंकेचा एकदिवसीय संघ:


दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, चारिथ अस्लंका, आशान बंडारा, वानिंदू हसरंगा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमरा, दिलशान मदुशंका, पथुम निसांका, प्रमोद मदुशान, सामुना राजविरा, कासून, महाराणी, महाराणी, नुवानिंदू फर्नांडो, जेफ्री वँडरसे, ड्युनिथ वेलाल्गे.


भारत विरुद्ध श्रीलंका Head to Head


भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात आतापर्यंत तब्बल 162 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारतानं यामध्ये 93 सामने जिंकले असून श्रीलंका संघाला 57 सामने जिंकण्यात यश आलं आहे. याशिवाय दोघांमधील एकूण 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसंच एक सामना बरोबरीत सुटला आहे.


हे देखील वाचा-