Mankading Laws : भारतीय महिला संघातील अष्टपैलू खेळाडू दिप्ती शर्मा सध्या चर्चेत आहे. इंग्लंडविरोधात लॉड्रसच्या मैदानात तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीप्ती शर्माने चार्लोट डीन हिला मंकडिंग (धावबाद) केलं होतं. दिप्ती शर्मानं केलेलं मंकडिंग आयसीसीच्या नियमांनुसार स्पिरिट ऑफ गेम प्रमाणेच आहे. पण काही जणांना दिप्ती शर्मानं केलेले धावबाद खेळभावनेला धरुन नसल्याचं वाटत आहे. सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे. आजी-माजी क्रिकेटपटूसह नेटकरीही आपलं मत व्यक्त करत आहेत. (Utility News In Marathi)


याआधीही अनेक खेळाड मंकडिंग झाले आहेत. पण आयसीसीनं याला आता नियमांमध्ये सामाविष्ट केलेय. याआधी मंकडिंग केल्यानंतर खिलाडूवृत्ती मानलं जात नव्हतं. पण नियमांनुसार हे बाद होतं. याप्रकारच्या धावबादला पहिल्या नियमांत 41.16.1 (अनुचित बाद) ठेवलं होतं. 41.16.1 नुसार जर गोलंदाजाला वाटलं की फलंदाज चेंडू टाकण्याआधी आपली खेळपट्टी सोडत आहे तर नॉन-स्ट्रायकर फलंदाजाला बाद करता येऊ शकतं. यामध्ये चेंडू मोजला जात नाही पण फलंदाजाला बाद दिलं जाते. पण आयसीसीनं आता मंकडिंग नियम 41.16.1 यामधून धावबाद नियमात (38) सामाविष्ट केले आहे. म्हणजेच मंकडिंग करणे खिलाडूवृत्तीविरोधात नाही. मंकडिंग बाद करणं म्हणजे सर्वसामान्य धावबादप्रमाणे ग्राह्य धरलं जाईल. त्यामुळे येणाऱ्या काळात क्रिकेटमध्ये मंकडिंग पाहायला मिळेल. 


मंकडिंग पुन्हा चर्चेत का?
भारतीय महिला आणि इंग्लंड महिला यांच्यात झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर मंकडिंग पुन्हा चर्चेत आले. दिप्ती शर्मा 44 वे षटक टाकत होती, त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी 16 धावांची गरज होती. चार्लोट डीन आणि फ्रेया डेविस ही अखेरची जोडी मैदानावर होती. 44 व्या षटकातील चौथा चेंडू फेकण्यासाठी दिप्ती सरसावली होती, त्याचवेळी नॉन-स्ट्रायकरवर असणारी चार्लोट डीन क्रीजसोडून बाहेर आली. दिप्तीनं चेंडू टाकण्याऐवजी चपळाईनं स्टम्पला चेंडू लावला आणि बादची अपिल केली. प्रकरण तिसऱ्या पंचाकडे गेलं. तिसऱ्या पंचांनी चार्लोट डीन हिला बाद दिलं. 
 
मंकडिंगचा नियम कसा झाला?
 भारताचा माजी अष्टपैलू विनू मंकड यांच्यावर मंकडिंग नियम क्रिकेटमध्ये आला.  1947 मध्ये भारताच्या विनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज बिल ब्राउन याला धावबाद केले होते. विनू मंकड गोलंदाजी करत होते, त्यावेळी बिल ब्राउन क्रिजसोडून बाहेर गेले, त्याचवेळी विनू मंकड यांनी धावबाद केले. ब्राउन यांना धावबाद देण्यापूर्वी गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वी क्रीज सोडू नकोस, असा इशारा दिला होता. या दौऱ्यात विनू मंकड यांनी ब्राउन याला दोन वेळा याच पद्धतीनं धावबाद केले. क्रिकेटच्या नियमांनुसार हा धावबाद होता. त्यानंतरही अशाप्रकारच्या धावबादला मंकडिंग म्हटले जाऊ लागले. 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मंकडिंग होणारे प्रमुख खेळाडू -
1. बिल ब्राउन, ऑस्ट्रेलिया 
2. इयान रेडपाथ, ऑस्ट्रेलिया 
3. डेरेक रँडेल, इंग्लंड  
4. सिकंदर बख्त, पाकिस्तान 
5. ब्रायन लकहर्स्ट, इंग्लंड 
6. ग्रांट फ्लावर, झिम्बाब्वे 
7. पीटर कर्स्टन
8. जोस बटलर
9. मार्क चॅपमॅन