Virat Kohli Rishabh Pant Delhi squad Ranji Trophy : रणजी ट्रॉफी 2024-25 चा दुसरा टप्पा 23 जानेवारीपासून सुरू होत आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाच्या पराभवानंतर भारतीय फलंदाजांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण मालिकेत विराट कोहली, शुभमन गिलपासून ते कर्णधार रोहित शर्मापर्यंत सर्वच स्टार खेळाडू फेल ठरले. त्यानंतर माजी क्रिकेटपटूंनी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. त्याच वेळी, आता रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दिल्ली संघाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ज्यामध्ये विराट कोहली आणि ऋषभ पंत यांची नावे देखील समाविष्ट आहेत.






2024-25 च्या रणजी ट्रॉफी हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दिल्लीच्या संभाव्य संघात विराट कोहली, ऋषभ पंत आणि हर्षित राणा यांचा समावेश करण्यात आला आहे. डीडीसीएने जाहीर केलेल्या 41 सदस्यीय संभाव्य संघात आयुष बदोनी, नवदीप सैनी आणि यश धुल यांचा समावेश आहे. विराट कोहलीने 2012 मध्ये शेवटचा रणजी सामना खेळला. उत्तर प्रदेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या पहिल्या डावात कोहलीने 14 धावा आणि दुसऱ्या डावात 42 धावा केल्या. तेव्हापासून आजपर्यंत कोहलीने एकही रणजी सामना खेळलेला नाही.






पण, डीडीसीएचे सचिव अशोक शर्मा म्हणतो की, “विराट आणि ऋषभ दोघांचीही नावे संभाव्य यादीत आहेत. रणजी ट्रॉफी कॅम्प सुरू आहे. बीसीसीआयने असेही म्हटले आहे की खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घ्यावा. मला वाटतं विराट आणि ऋषभने किमान एक सामना खेळायला हवा, पण मला वाटत नाही की ते ते करतील."


दिल्लीचा संभाव्य संघ खालीलप्रमाणे -


विराट कोहली, ऋषभ पंत, हर्षित राणा, आयुष बदोनी, सनत सांगवान, गगन वत्स, यश धुळ, अनुज रावत, जॉन्टी सिद्धू, सिद्धांत शर्मा, हिम्मत सिंग, नवदीप सैनी, प्रणव राजवंशी, सुमित माथुर, मणी ग्रेवाल , शिवम शर्मा, मयंक गुसैन, वैभव कांडपाल, हिमांशू चौहान, हर्ष त्यागी, शिवांक वशिष्ठ, प्रिन्स यादव, आयुष सिंग, अखिल चौधरी, ऋतिक शौकीन, लक्ष्य थरेजा, आयुष दोसेजा, अर्पित राणा, विकास सोलंकी, समर्थ सेठ, रौनक वाघेला, अनिरुद्ध चौधरी, राहुल गेहलोत, भगवान सिंग, मयंक रावत, तेजस्वी दहिया, पारितिक, राहुल डागर, आर्यन राणा, सलील मल्होत्रा, जितेश सिंग.


हे ही वाचा -


Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीत संघाचा कर्णधार बदलणार? खराब फॉर्म नाही तर... समोर आले मोठे कारण, कोण होणार कॅप्टन?