World Cup 2023 : विश्वचषकानंतर रनमशीन विराट कोहली (virat kohli retirement) वनडे क्रिकेटमधून निवृत्त होणार, असे भाकित किंग कोहलीचा (King kohli) जिगरी दोस्त एबी डिव्हिलिअर्स (ab de villiers) याने केले आहे. एबी डिव्हिलिअर्स आणि विराट कोहली यांच्यातील दोस्ताना सगळ्या क्रिकेट विश्वाला माहित आहे. एबी डिव्हिलिअर्स याने विराट कोहली विश्वचषकानंतर निवृत्ती घेतल्यास आश्चर्य वाटू नये, असे म्हटलेय. विराट कोहलीने क्रिकेटमध्ये विक्रमावर विक्रम केले आहे. विराट जगातील दिग्गज फलंदाजामध्ये गणला जातो. रनमशीन विराट कोहलीने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे.
34 वर्षीय विराट कोहलीने आशिया चषकात पाकिस्तानविरोधात दमदार शतक ठोकले होते. आशिया चषक विजयात विराट कोहलीचा मोठा वाटा होता. विश्वचषक पाहता विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाविरोधातील दोन वनडे सामन्यातून आराम देण्यात आला होता. आता विराट कोहली टीम इंडियात कमबॅक करतोय. दुसरीकडे भारतीय संघ विश्वचषक जिंकणार का? याबाबतच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत एबी डिव्हिलिअर्स याला विचारले. एबी डिव्हिलिअर्सच्या मते, भारताने विश्वचषक जिंकला तर विराट कोहली वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायचा विचार करेल. २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिकामध्ये होणाऱ्या विश्वचषकात खेळण्यासाठी कोहली उत्सुक असल. पण हे थोडं कठीण आहे. कारण, त्यासाआठी खूप वेळ आहे. याबाबत कोहलीही तेच सांगेल. एबीच्या मते, जर भारताने विश्वचषक जिंकला तर निवृत्ती स्वीकारण्यासाठी ही योग्य वेळ ठरेल. कदाचित तो पुढील काही वर्षं कसोटी आणि आयपीएल खेळेल.
एबी डिव्हिलिअर्स आणि विराट कोहली यांच्यातील मैत्री जगजाहिर आहे. दोघांनी आयपीएलमध्ये एकाच संघाकडून प्रतिनिधित्व केलेय. आरसीबी संघाच्या ड्रेसिंग रुमध्ये या दोघांनी बराच काळ घालवलाय. ३७ व्या वर्षी एबी डिव्हिलिअर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 2004 ते 2021 पर्यंत 114 कसोटी, 228 वनडे, 78 टी20 आणि 184 आयपीएल सामने डिव्हिलिअर्स खेळला आहे. तर दुसरीकडे विराट कोहली अद्याप क्रिकेट खेळत आहे. विराट कोहलीन आतापर्यंत 111 टेस्ट, 280 वनडे आणि 115 टी20 सामने खेळले आहेत. विराट कोहली यंदाच्या विश्वचषकासाठी सज्ज झालाय. विराट कोहली आणि रोहित शर्मा टीम इंडियातील सर्वात अनुभवी खेळाडू आहेत. भारताच्या विजयात या दोन्ही खेळाडूंची कामगिरी महत्वाची ठरणार आहे.