Virat Kohli Fee For Social Media Post : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही सुपरहिट आहे. विराट कोहली हा जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. पण विराट कोहली एका सोशल मीडिया (Social Media) पोस्टसाठी किती रुपये घेतो, याची तुम्हाला कल्पना आहे का? विराट कोहलीचे इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर कोट्यवधी चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचे 256 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याचवेळी विराट कोहली फेसबुकसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही लोकप्रिय आहे.


विराट कोहली इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरुन किती कमावतो?


विराट कोहली एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 8.9 कोटी रुपये घेतो. तर माजी भारतीय कर्णधार एका ट्विटर पोस्टसाठी 2.5 कोटी रुपये घेतो. याशिवाय विराट कोहली 18 ब्रँडसोबत काम करतो आणि त्याच्या एका दिवसाच्या जाहिरातीतून 7.50 कोटी ते 10 कोटी रुपये कमावतो. अशाप्रकारे विराट कोहलीचा जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश झाला आहे.


विराट कोहलीच्या उत्पन्नाचे स्रोत काय?


विराट कोहलीची एकूण संपत्ती 1050 कोटी आहे. यामध्ये क्रिकेट करार, ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडिया पोस्टचा समावेश आहे. वृत्तानुसार कोहलीच्या कमाईचा मोठा हिस्सा ब्रँड एंडोर्समेंटमधून येतो.  शिवाय विराट कोहलीचे वेगवेगळ्या खेळांचे संघ देखील आहेत, ज्यात फुटबॉल, टेनिस आणि कुस्ती संघांचा समावेश आहे. कोहलीने ब्लू ट्राइब, युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिझ, एमपीएल, स्पोर्ट्स कॉन्व्हो, डिजिट इत्यादी स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. विराट 18 पेक्षा जास्त ब्रँड्सचा अॅम्बेसेडर आहे. तसंच विराट कोहलीचं गुरुग्राम आणि मुंबई इथे आलिशान घर आहे. विराट कोहलीच्या गुरुग्राममधील घराची किंमत जवळपास 34 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. तर विराट कोहलीच्या मुंबईतील आलिशान घराची किंमत जवळपास 80 कोटी रुपयं आहे. त्यामुळे विराट कोहली हा भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू असल्याचं मानलं जातं.


एका सामन्याची फी किती आहे?


विराट कोहली हा BCCI च्या A+ श्रेणीमध्ये समाविष्ट असलेला खेळाडू आहे. त्याची वार्षिक कमाई सात कोटी रुपये आहे. एका कसोटी सामन्याची त्याची फी 15 लाख रुपये आहे. एका एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्याची फी 6 लाख रुपये आहे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात. तर T20 लीग म्हणजेच IPL मधून तो वर्षाला 15 कोटी रुपये कमावतो.


हेही वाचा


Team India: सचिन, धोनी की विराट ? भारताचा सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण?