Virat Kohli Anushka Sharma London : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपनंतर भारतीय संघातील खेळाडू सध्या ब्रेकवर आहेत. जुलै महिन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे, त्यापूर्वी खेळाडूंना आराम दिलाय. त्यामुळे काही खेळाडू कुटुंबासह फिरायला गेले आहेत. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीही पत्नी अनुष्कासोबत लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडनमध्ये किर्तन ऐकण्यासाठी गेल्याचे समोर आलेय. विराट-अनुष्काचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी लंडनमध्ये कृष्णा दास यांच्या किर्तनाला उपस्थिती लावली होती. कृष्ण दास अमेरिकन व्होकलिस्ट आहेत. ते भक्ती-गितासाठी ओळखले जातात. त्यांच्या कार्यक्रमाला विराट आणि अनुष्का यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विराट-अनुष्का अनेकदा धार्मिक स्थळांना भेट देत असतात. विविध मंदिरांना भेट देत आशीर्वाद घेत असतात. 


विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी या आधीही धार्मिक स्थळाला भेटी दिल्या आहेत. गेल्यावर्षी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा मध्यप्रदेशमधील उज्जैनमधील महाकाल दर्शनासाठी गेले होते. तिथे त्याने भस्म आरतीमध्येही सहभाग घेतला होता. त्याआधी वृंदावन येथेही हे जोडपे गेले होते. आता त्यांनी लंडनमध्ये किर्तनाला उपस्थिती लावली आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 














भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार - 


महिनाभराच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. जुलैमध्ये भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये कसोटी, वनडे आणि टी 20 सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. 12 जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. कसोटी सामन्यापासून वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. अखेरीस पाच टी20 सामन्याची मालिका होणार आहे. त्यापूर्वी विराट कोहलीसह टीम इंडियाचे खेळाडू ब्रेकवर आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, या दौऱ्यात टीम इंडियाच्या सिनिअर खेळाडूंना आराम देण्याची शक्यता आहे.