Virat Kohli got angry on KL Rahul : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार 19 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि न्यूझीलंड सामन्याने रंगला. त्यानंतर या स्पर्धेतील दुसरा सामना टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या ग्रुप-अ सामन्याचा उत्साह कायम आहे.

केएल राहुलची खराब विकेटकीपिंग

एकीकडे, या सामन्यात टीम इंडियाचे गोलंदाज शानदार गोलंदाजी करत आहे. पण दुसरीकडे, टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी सामान्य क्षेत्ररक्षणामुळे निराशा केली. रोहित शर्माने सोपा झेल सोडल्यानंतर, यष्टीरक्षक केएल राहुलने काही चुका केल्या आणि यामुळे बांगलादेशला खराब सुरुवातीतून सावरण्याची संधी मिळाली.

विराट कोहली केएल राहुलवर रागावला! 

अवघ्या 35 धावांत 5 विकेट गमावल्यानंतर बांगलादेश संघ अडचणीत सापडला होता. पण त्यानंतर यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुलने स्टंपच्या मागे एक झेल चुकवला आणि स्टंपिंगची संधीही गमावली. राहुलने स्टंप सोडली तेव्हा संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीही रागात दिसत होता.

बांगलादेशच्या डावाच्या 23 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर झाकेर अली रवींद्र जडेजाला एक मोठा शॉट खेळण्यासाठी पुठे आला,पण तो चुकला. या चेंडूवर तो क्रीजच्या खूप पुढे गेला. पण केएल राहुलने विकेटमागे स्टंपिंगची संधी हुकवली. राहुलने स्टंपिंगची संधी गमावल्यानंतर विराट कोहली खूप संतापला आणि त्याने काही शब्दांत आपली निराशा व्यक्त केली. त्यावेळी बांगलादेशची धावसंख्या 5 बाद 84 धावा होती.

5 विकेट गमावल्यानंतर बांगलादेश सावरला

भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार सुरुवात केली, बांगलादेश संघाचा डाव हादरवून टाकला. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ गोलंदाजी करण्यासाठी आला आणि बांगलादेशच्या टॉप ऑर्डरने गुडघे टेकले आणि फक्त 10 षटकांत 5 विकेट घेत सामन्यावर ताबा मिळवला. पण यानंतर, झाकीर अली आणि तोहिद हडोय यांनी सहाव्या विकेटसाठी 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे.

हे ही वाचा - 

VIDEO : रोहित शर्माने माती खाल्ली, अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकली! हिटमॅनने हात जोडून माफी मागितली, नेमकं काय घडलं?

IND VS PAK सामन्याआधी पाकिस्तान संघाची मोठी घोषणा! अचानक संघात केला बदल, धाकड खेळाडूची एन्ट्री