SAUR vs MAH, Vijay Hazare Trophy 2022: विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा पाच विकेट्सनं पराभव
Vijay Hazare Trophy Final Live: महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यात आज (2 डिसेंबर 2022) विजय हजारे ट्रॉफी 2022 स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना रंगणार आहे.
एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 02 Dec 2022 02:26 PM
पार्श्वभूमी
SAUR vs MAH, Vijay Hazare Trophy 2022 Final LIVE UPDATES: महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यात आज (2 डिसेंबर 2022) विजय हजारे ट्रॉफी 2022 स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी...More
SAUR vs MAH, Vijay Hazare Trophy 2022 Final LIVE UPDATES: महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यात आज (2 डिसेंबर 2022) विजय हजारे ट्रॉफी 2022 स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राचा संघानं विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. तर, सौराष्ट्राचा संघ दुसऱ्यांना ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सज्ज झालाय. या स्पर्धेत सौराष्ट्राच्या गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळालाय. तर, महाराष्ट्राच्या फलंदाजांनी विरोधी संघातील गोलंदाजांच्या डोळ्यात पाणी आणलंय. ऋतुराज गायकवाडची जबरदस्त फलंदाजीकर्णधार ऋतुराज गायकवाडवर महाराष्ट्राची फलंदाजी अवलंबून आहे. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यानं स्वबळावर महाराष्ट्राला फायनलमध्ये पोहचलं आहे. गायकवाडनं या स्पर्धेत चार सामन्यांत 552 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध नाबाद 220 धावांची विक्रमी खेळी केली. त्या डावात त्यानं एका षटकात सात षटकारही मारले. त्याच्याशिवाय महाराष्ट्राचा आणखी एक फलंदाज अंकित बावणेनं आठ डावांत 572 धावा केल्या आहेत.जयदेव उनादकटची दमदार गोलंदाजीसौराष्ट्राची गोलंदाजी कर्णधार जयदेव उनादकटच्या खांद्यावर असेल. या स्पर्धेत त्यानं 18 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्यानं सेमी फायनलमध्ये कर्नाटकविरुद्ध 26 धावांत चार आणि हिमाचलविरुद्धच्या गट सामन्यात 23 धावांत पाच विकेट्स घेतल्या आहेत.सौराष्ट्राचा चेतेश्वर पुजारा, साकारिया सामन्याला मुकणारसौराष्ट्रचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा या सामन्यात खेळू शकणार नाही. तो सध्या बांगलादेशमध्ये भारत अ संघासोबत कसोटी मालिकेची तयारी करत आहे. याशिवाय सौराष्ट्राचा डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाही या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही. तामिळनाडूविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याच्या बोटाला दुखापत झाली होती.राहुल त्रिपाठी महाराष्ट्राकडून खेळू शकणार नाहीराहुल त्रिपाठी महाराष्ट्राकडून खेळू शकणार नाही. बांगलादेशविरुद्ध येत्या 4 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.महाराष्ट्राची प्लेईंग इलेव्हन:ऋतुराज गायकवाड (कर्णधार), सत्यजीत बच्छाव, अंकित बावणे, अजीम काझी, राजवर्धन हंगरगेकर, शमशुजामा काझी, सौरभ नवले (विकेटकिपर), मनोज इंगळे, मुकेश चौधरी, पवन शहा, नौशाद शेखसौराष्ट्राची प्लेईंग इलेव्हन:हार्विक देसाई (विकेटकिपर), शेल्डन जॅक्सन, जय गोहिल, समर्थ व्यास, प्रेरक मंकड, अर्पित वसावडा, चिराग जानी, धर्मेंद्रसिंह जडेजा, जयदेव उनाडकट (कर्णधार), कुशांग पटेल, पार्थ भुतहे देखील वाचा-Rajeshwari Gayakwad: महिला क्रिकेटर राजेश्वरी गायकवाडचा सुपर मार्केटमध्ये राडा, कर्मचाऱ्याला केली मारहाण
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सौराष्ट्राची चांगली सुरुवात; हार्विक देसाई, शेल्डन जॅक्सन क्रिजवर
महाराष्ट्रानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सौराष्ट्राची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर हार्विक देसाई आणि शेल्डन जॅक्सन संयमी खेळी करत संघाचा डाव पुढं घेऊन जात आहेत.