Vaibhav Suryavanshi Century U19 Asia Cup 2025 : टीम इंडियाची जर्सी घालताच वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या तुफानी कामगिरी धमाका केला. यावेळी वनडे फॉर्मेटमधील अंडर-19 आशिया कपमध्ये वैभवने तांडव घातला. दुबईत भारत आणि यूएई यांच्यातील सामन्यात वैभवने तुफानी कामगिरी करत यूएईच्या गोलंदाजांना धू-धू धुतलं. कर्णधार आयुष म्हात्रे फक्त 4 धावांवर बाद झाल्यानंतर 14 वर्षांच्या या पठ्ठ्याने जबाबदारी हाती घेतली. कोणतीही घाई न करता, अप्रतिम संयम राखत त्याने फटकेबाजीची आतषबाजी केली आणि केवळ 56 चेंडूमध्ये शतक ठोकले.

Continues below advertisement

Continues below advertisement

वैभवने 56 चेंडूमध्ये ठोकले शतक

यूएईविरुद्धच्या या सामन्यात वैभव सूर्यवंशीने फक्त 56 चेंडूमध्ये शतक झळकावले. या दरम्यान त्याने 9 षटकार आणि 5 चौकार मारत गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याआधी त्याने आपले अर्धशतक फक्त 30 चेंडूमध्ये पूर्ण केले होते. या शतकी खेळीमुळे वैभव अंडर-19 आशिया कपच्या इतिहासातील सर्वात कमी वयात शतक करणारा खेळाडू ठरला. वैभव सूर्यवंशीच्या सेलिब्रेशनची चर्चा आता होतं आहे, त्याने हात जोडून देवाचे आभार मानले.

इतिहासातील सर्वात कमी वयात शतक ठोकणारा खेळाडू

वैभव सूर्यवंशीने हे शतक 14 वर्षे 260 दिवसांच्या वयात झळकावून नवा विक्रम रचला. तो आता या स्पर्धेत सर्वात कमी वयात शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. यूएई ‘ए’ संघाविरुद्धही हे त्याचे पहिलाच शतक होते. तर युथ वनडेमध्ये त्याच्या कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्धच्या युथ वनडेमध्ये शतक झळकावले होते.

2025 मध्ये वैभव सूर्यवंशीची कामगिरी

    • आयपीएलमधील शतक.
    • आयपीएलमधील भारतीय खेळाडूने केलेले सर्वात जलद शतक.
    • इंग्लंडमधील युवा एकदिवसीय सामन्यात शतक.
    • ऑस्ट्रेलियातील युवा कसोटीत शतक.
    • भारत अ संघासाठी 32 चेंडूत शतक.
    • सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतक.
    • 19 वर्षांखालील आशिया कपमध्ये भारतासाठी शतक.

हे ही वाचा -

IPL 2026 Auction : मुंबईच्या पर्समध्ये पैसे कमी… पण दहशत तितकीचं! अंबानी 'या' 5 खेळाडूंना संघात घेण्यासाठी पैसा करणार खर्च? कोण आहे ते स्टार...