Star Sports Officers met Raj Thackeray : मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन कायम आक्रमक असणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आता स्टार स्पोर्टस चॅनेलवर (Star Sports Channel) आक्रमक झाली आहे. स्टार स्पोर्ट्सवर ज्याप्रकारे इतर भाषांमध्ये प्रक्षेपण केलं जातं, तसंच मराठीतूनही करण्यात यावं या मागणीसाठी मनेसेने आंदोलनाचा इशारा दिला असून स्टार स्पोर्ट्सला आपल्या भाषेत धडा शिकवण्याचा इशाराही दिला आहे.ज्यानंतर स्टार स्पोर्ट्स चॅनेलचे अधिकारी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीला गेले आहेत.


यावेळी मनसेच्या दूरसंचार सेनेचे अध्यक्ष सतीश नारकर, महासचिव निर्मल निगडे, प्रमोद मंधारे, दिनेश वटवे, संतोष पगारे, सचिव आशिष गावडे, विशान साहनी, सलीम पागरकर, अभय पारकर असे बरेचजण उपस्थित होते. ज्यांनी विविध मुद्दे समोर ठेवले. 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेला सुरुवात होत आहे. पण यंदाही स्टार स्पोर्ट्सवर मराठीतून प्रक्षेपण होणार नसल्याने मनसे आक्रमक झाली आहे. मनसेच्या दूरसंचार सेनेचे अध्यक्ष सतीश नारकर यांच्या नेतृत्त्वाखाली स्टार स्पोर्ट्स्च्या लोअर परेल येथील कार्यालयात मोर्चाचं आयोजन केलं गेल आणि स्टार स्पोर्ट्सला अल्टीमेटम देण्यात आला आहे.


टी20 विश्वचषकाचं प्रक्षेपण आता मराठीतून?


मनसेचे दूरसंचार सेना अध्यक्ष सतीश नारकर यांनी स्टार स्पोर्ट्स अधिकाऱी आणि राज ठाकरे यांच्या भेटीबद्दलची माहिती दिली. तसच यावेळी त्यांनी हा मनसेचा मोठा विजय असल्याचंही आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे आता इतर भाषांप्रमाणे टी20 विश्वचषक क्रिकेट सामन्याचं मराठीतूनही प्रक्षेपण होईल अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे.






विश्वचषकासाठी टीम इंडिया सज्ज


ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पोहोचला असून सराव सामनेही सुरु झाले आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया 11 विरुद्ध भारताने दोन सामने खेळले ज्यातील एक भारताने जिंकला असून एकात भारत पराभूत झाला आहे. आता भारत न्यूझीलंडविरुद्धही सराव सामने खेळणार आहे. विश्वचषकापूर्वी भारताने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांना टी20 मालिकेत पराभूत केलं आहे. 


हे देखील वाचा -