Aaron Finch Selfie: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2022) अवघे काहीच तास शिल्लक राहिले आहेत. उद्यापासून म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून या स्पर्धेतील क्वालिफाय सामन्यांना खेळले जातील. यापूर्वी या स्पर्धेतील 16 संघाचे कर्णधार विश्वचषक ट्रॉफीसह (T20 World Cup Trophy) एकाच फ्रेममध्ये दिसले आहेत. आयसीसीनं (ICC) हा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. यासोबत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचनंही (Aaron Finch) टी-20 विश्वचषकातील सर्व 16 कर्णधारांसोबत काढलेला सेल्फीही आयसीसीनं शेअर केलाय.


टी-20 विश्वचषकापूर्वी आयसीसीनं ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यात आरोन फिंचनं काढलेल्या सेल्फीचाही समावेश आहे. दरम्यान, पहिल्या फोटोमध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता न्यूझीलंडच्या संघाचे कर्णधार आरोन फिंच आणि केन विल्यमसन हे मध्यभागी एकमेकांच्या शेजारी बसले आहेत. या दोन कर्णधारांच्या मागेच गेल्या वेळच्या उपांत्य फेरीतील पाकिस्तान आणि इंग्लंडच्या कर्णधारांना स्थान मिळालं आहे. फोटोत डाव्या बाजुला भारतीय कर्णधार रोहित शर्मा बसला आहे. आयसीसीच्या दुसऱ्या फोटोत रोहित शर्मा आरोन फिंचच्या मागं उभा आहे.


आयसीसीचं ट्वीट-






 


आयसीसीचं ट्वीट-






 


उद्यापासून रंगणार टी-20 विश्वचषकाचा थरार
आगामी टी-20 विश्वचषकाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. नामिबिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी-20 विश्वचषकाचा सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, रविवारी सकाळी 9.30 वाजता या सामन्याला सुरूवात होईल. यानंतर लगेचच नेदरलँडचा संघ यूएईशी भिडणार आहे. 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबरदरम्यान 8 संघ एकमेकांशी भिडणार आहेत. या 8 पैकी 4 संघ सुपर-12 फेरीत प्रवेश करतील. सुपर-12 मध्ये आधीच 8 संघ आहेत. सुपर-12 चे सामने 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे.


ऑस्ट्रेलियाच्या या प्रमुख शहरात रंगणार टी-20 विश्वचषकातील सामने
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 


हे देखील वाचा-