The most expensive delivery ever : क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते, याची प्रचिती तामिळनाडू प्रिमिअर लीगमध्ये आली आहे. अखेरच्या चेंडूवर तब्बल 18 धावा निघाल्या आहेत. या चेंडूची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. क्रिकेटमध्ये एका षटकात 36 धावा निघालेल्या पाहिल्या आहेत... विजयासाठी 29 धावांची गरज असताना रिंकूने पाच षटकार मारल्याचेही पाहिलेय.. एका चेंडूत सहा धावांची गरज असतानाही पाहिलेय.... पण एका चेंडूत 18 धावा देण्याची ही कदाचीत पहिलीच वेळ असेल. तामिळनाडू प्रिमिअर लीग स्पर्धेत असे घडलेय.. अखेरच्या चेंडूवर तब्बल 18 धावा दिल्या... टी 20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडा चेंडू असल्याची चर्चाही सुरु आहे.
तमिळनाडू प्रिमिअर लीगमध्ये सालेम स्पार्टन्स आणि चेपॉक सुपर गिलीज यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात एकाच चेंडूवर 18 धावा खर्च झाल्या. एका चेंडूत 18 धावा देणाऱ्या गोलंदाजाचे नाव अभिषेक तंवर असे आहे. संजय यादव फलंदाजी करत होता... अभिषेक तंवर याने 20 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर संजय यादव याचा त्रिफाळा उडवत, आनंद साजरा केला... पण हा चेंडू नो बॉल असल्याचे समोर आले. त्यानंतर फ्री हिट मिळाला. त्या चेंडूवर संजय यादववे षटकार मारला. आश्चर्य म्हणजे अभिषेक तंवर याने फेकलेला फ्री हीटही नो बॉलच होता. अभिषेक तंवर याने लागोपाठ तीन नो बॉल फेकले अन् एक वाईड फेकला. तीन नो बॉलच्या तीन धावा अन् एक वाईड अशा अतिरिक्त चार धावा... त्याशिवाय पहिल्या फ्रि हीटवर षटकार आणि दुसऱ्या फ्री हीटवर दोन धावा कुटल्या होत्या.. तसेच अखेरच्या फ्री हीटवर षटकार मारला होता.. संजय यादव याने या चेंडूवर 18 धावा कुटल्या.. सध्या या षटकाची जोरदार चर्चा होत आहे. अभिषेक तवंर याने शेवटच्या चेंडूवर 18 धावा खर्च केल्या... संपूर्ण षटकात त्याने 26 धावा दिल्या.
अभिषेक तंवर याच्या नावावर लाजीरवाणा विक्रम -
अखेरच्या चेंडूवर 18 धावा खर्च करणारा गोलंदाज अभिषेक तंवर हा सालेम स्पार्ट्न्स संघाचा कर्णधार आहे. अभिषेक तंवर याच्यानावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली. भारताकडून एका चेंडूत सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम अभिषेकच्या नावावर जमा झालाय. वर्ल्ड क्रिकेटमध्ये हा विक्रम क्लिंट मॅकॉय याच्या नावावर आहे. क्लिंट मॅकॉय याने 2012-13 मध्ये एका चेंडूवर 20 धावा खर्च केल्या होत्या.