Tim Southee Record in India vs New Zeland T20 : न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साउदीने भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत हॅट्रीक घेतली. अखेरच्या षटकांत त्याने केवळ 5 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने या हॅट्रीकसह आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात (hat trick in t20) दुसरी हॅट्रीक घेतली आहे. लसिथ मलिंगानंतर (lasith Malinga) अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. याशिवाय सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याच्या यादीतही तो अव्वलस्थानी विराजमान आहे.
न्यूझीलंडमधील माऊंट मॉन्गनुई येथील बे ओवल क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात भारताने 65 धावांनी विजय मिळवला. आधी फलंदाजी करत भारताने सूर्यकुमार यादवच्या (suyakumar Yadav) नाबाद 111 धावांच्या जोरावर न्यूझीलंडसमोर 192 धावांचं आव्हान ठेवले. जे पूर्ण करताना न्यूझीलंडचा संघ 126 धावांत सर्वबाद झाला. केवळ कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) 61 धावांची एकहाती झुंज दिली. पण दीपक हुडाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्यामुळे 18.5 षटकांत न्यूझीलंडचा संघ (New Zealand) 126 धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे सामना भारताने 65 धावांनी जिंकला. सामना न्यूझीलंडने गमावला असला तरी टीम साउदीने हॅट्रीक घेत एक मोठा रेकॉर्ड नावावर केला आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्सही नावावर
टीम साऊदीने (Tim Southee) आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्यात अव्वल स्थान विश्वचषकात गाठलं होतं. त्याने बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनला मागे टाकलं होतं. भारताविरुद्धच्या हॅट्रीकनंतर साउदीच्या नावावर टी-20 कारकिर्दीत 106 सामने खेळत 132 विकेट्स नावावर झाल्या आहेत. तसंच, शाकिब अल हसन त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने एकूण 109 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत ज्यात त्याच्या नावावर 128 विकेट्स घेतल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
- टीम साउदी (न्यूझीलंड) – 104 सामने– 132 विकेट्स
- शाकिब अल हसन (बांगलादेश) – 109 सामने– 128 विकेट्स
- राशिद खान (अफगाणिस्तान) – 74 सामने– 122 विकेट्स
- ईश सोढी (न्यूझीलंड) – 87 सामने– 110 विकेट्स
- लसिथ मलिंगा (श्रीलंका) – 84 सामने– 107 विकेट्स
हे देखील वाचा-