Team India squad For T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी शनिवारी बीसीसीआयच्या निवड समितीने संघाची घोषणा केली. संघाची निवड करताना भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा शुभमन गिल (Shubhman gill) याला निवड समितीने खूप मोठा धक्का दिला. शुभमन गिल याला विश्वचषकाच्या (T20 World Cup) संघातून वगळण्यात आले आहे. त्याऐवजी ओपनिंगला ईशान किशनला संघात घेण्यात आले आहे. तर अक्सर पटेलला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्वेन्टी-20 फॉर्मेटमध्ये शुभमन गिलकडून फारशा धावा केल्या नसल्या तरी टेस्ट आणि वनडे फॉर्मेटमधील भारतीय संघाचा कर्णधार आणि गोल्डन बॉय असलेल्या शुभमन गिलला बीसीसीआय संघात स्थानच देणार नाही, अशी अपेक्षा कोणालाही नव्हती. या पार्श्वभूमीवर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी एक टिप्पणी केली आहे.
शुभमन गिलची संघात निवड न होणे, हा अनेकांसाठी धक्का होता. याबाबत सुनील गावसकर यांनी अशाप्रकारचा काही निर्णय घेतला जाईल, असे कोणालाच वाटले नव्हते, अशी कबुली दिली. अशाप्रकारचा निकाल आश्चर्यकारक नसला तरी शुभमन गिल याच्याबाबतचा निर्णय काहीसा अनपेक्षित होता. शुभमन गिल हा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याने यापूर्वी खूप धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो धावांसाठी काहीसा झगडताना दिसला. पण फॉर्म हा तात्पुरता विषय आहे, पण त्या खेळाडूचा क्लास हा महत्त्वाचा असतो. शुभमन गिल हा एक टेस्ट प्लेयर आहे. तो जमिनीलगत तंत्रशुद्ध फटके मारतो. ट्वेन्टी-20 मध्ये धावा करण्यासाठी ज्याप्रकारे फटके मारावे लागतात, ती गोष्ट शुभमनच्या बाबतीत सहजपणे साध्य होणार नाही. त्यामुळे त्याला अडचणी येत आहेत. मात्र, एक फलंदाज म्हणून तो उत्कृष्ट आहे. आपण आयपीएलमध्ये त्याची फलंदाजी पाहिली आहे. हा फॉर्मेट त्याच्यासाठी नवीन नाही, असे सुनील गावसकर यांनी म्हटले.
यावेळी सुनील गावसकर यांनी अलीकडेच आपण एकाच विमानातून शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांच्यासोबत प्रवास केल्याचे सांगितले. यावेळी गावसकर यांनी शुभमन गिल याला, 'घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीला तुझी दृष्ट काढायला सांग', असा सल्ला दिला. अलीकडच्या काळात त्याला झालेल्या दुखापती पाहता मी तसे बोललो, असे गावसकर यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-20 मालिकेत उपकर्णधार असलेल्या शुभमन गिल याने 4,0 आणि 28 अशा धावा केल्या होत्या. चौथा सामना रद्द झाला होता. तर पाचव्या सामन्यात दुखापतीमुळे शुभमन गिल खेळू शकला नव्हता.
Shubhman Gill: टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग (इशान किशन).
T20 World Cup: भारताचे सामन्यांचे वेळापत्रक
भारत 7 फेब्रुवारी रोजी मुंबईत अमेरिकेविरुद्ध विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीत नामिबिया, 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये पाकिस्तान आणि 18 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये नेदरलँड्सविरुद्ध सामने होतील.
आणखी वाचा