Team India Squad Against New Zealand: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेनंतर आता न्यूझीलंडविरुद्ध भारताची मालिका (India vs New Zealand) होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांनी एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी आज बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. (India vs New Zealand ODI And T20 Schedule) आगामी टी-20 विश्वचषकासाठी जो संघ जाहीर करण्यात आला आहे, तोच संघ न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका खेळेल.

Continues below advertisement

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संपूर्ण संघ- (Team India Squad NZ T20)

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, इशान किशन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा

21 जानेवारीपासून टी-20 मालिकेचा थरार- (India vs New Zealand T20)

वनडे मालिकेनंतर टी-20 वर्ल्ड कपच्या अगोदर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना 21 जानेवारी रोजी नागपूरमध्ये होईल. दुसरा सामना 23 जानेवारीला रायपूर येथे, तर तिसरा सामना 25 जानेवारीला गुवाहाटीमध्ये खेळवला जाईल. चौथा सामना 28 जानेवारीला विशाखापट्टणम येथे होणार असून, मालिकेचा अंतिम सामना31 जानेवारीला तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाईल. टी-20 मालिकेतील सर्व सामने सायंकाळी 7:00 वाजता सुरू होतील.

Continues below advertisement

भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक (India vs New Zealand ODI Schedule)

पहिला एकदिवसीय सामना - 11 जानेवारी - वडोदरा - दुपारी 1:30 वाजतादुसरा एकदिवसीय सामना - 14 जानेवारी - राजकोट - दुपारी 1:30 वाजतातिसरा एकदिवसीय सामना - 18 जानेवारी - इंदूर - दुपारी 1:30 वाजता

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 मालिकेचे वेळापत्रक (India vs New Zealand T20 Series Schedule)

पहिला टी-20 सामना - 21 जानेवारी - नागपूर - संध्याकाळी 7:00 वाजतादुसरा टी-20 सामना - 23 जानेवारी - रायपूर - संध्याकाळी 7:00 वाजतातिसरा टी-20 सामना - 25 जानेवारी - गुवाहाटी - संध्याकाळी 7:00 वाजताचौथा टी-20 सामना - 28 जानेवारी - विशाखापट्टणम - संध्याकाळी 7:00 वाजतापाचवा टी-20 सामना - 31 जानेवारी - तिरुवनंतपुरम - संध्याकाळी 7:00 वाजता

संबंधित बातमी:

T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम

Team India squad For T20 World Cup 2026 : चक दे इंडिया! टी-20 विश्वचषक 2026 साठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादव कर्णधार, शुभमन गिलचा पत्ता कट, पाहा 15 जणांचा तगडा Squad