Team India ODI Squad for England Series : भारताला या महिन्याच्या अखेरीस इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे. भारत इंग्लंडविरुद्ध पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण सर्व चाहत्यांच्या नजरा एकदिवसीय मालिकेवर लागल्या आहेत. वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. अशा परिस्थितीत विराट कोहली आणि रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण तरी ते अजूनही एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत. स्पोर्ट्सक्रीडाच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय मालिकेत इंग्लंडविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची असल्याचे त्यामागचे कारण मानले जात आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे फॉरमॅटवर खेळवली जाणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतील, पण त्याआधी त्यांना आणखी एक किंवा दोन सामने खेळावे लागतील जेणेकरून त्यांना त्यांची तयारी होईल. त्यामुळे इंग्लंडची मालिका अधिक महत्त्वाची झाली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी फक्त तीन सामने
टीम इंडियाने गेल्या वर्षी फक्त तीन एकदिवसीय सामने खेळले. या तीन सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने टीम इंडियासाठी इंग्लंडची ही मालिका अधिक महत्त्वाची आहे. प्रत्येकाला 12 जानेवारीपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर करायचा आहे. इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जवळपास सारखाच संघ असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
वर्कलोड मॅनेजमेंटची समस्या मिटली...
टीम इंडियाला आगामी काळात कोणतीही कसोटी मालिका खेळायची नाही. याशिवाय विराट आणि रोहित हे फक्त कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळताना दिसतात, त्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंटची समस्या मिटली आहे. टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध ग्रुप स्टेजचे सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत तयारी लक्षात घेता या दोन्ही दिग्गजांचा वनडे मालिकेत समावेश केला जाऊ शकतो.
हे ही वाचा -