Continues below advertisement

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी सामन्याबाहेर गेला. भारतीय क्रिकेट संघाला या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. भारताचा माजी सलामीवीर अभिंव मुकुंद याने एक सल्ला बीसीसीआयला दिला आहे. अभिनव मुकुंद याच्या मते शुभमन गिल याच्यावर सध्या खूप दबाव आहे. त्यामुळे बीसीसीआयने प्रत्येक फॉरमॅट साठी स्वतंत्र कॅप्टन द्यावा, असा सल्ला अभिनव मुकुंद याने दिलाय.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी 14 नोव्हेंबरला सुरु झाली होती पण ती अवघ्या तीन दिवसांत संपली. भारतीय क्रिकेट संघाला दुसऱ्या डावात 124 धावांचं आव्हान पार करण्यात अपयश आलं. भारताचा संघ दुसऱ्या डावात 93 धावा करू शकला. यामुळे भारताचा 30 धावांनी पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने 15 वर्षानंतर भारतात कसोटी सामन्यात विजय मिळवला.

Continues below advertisement

गिलवरील दबाव कमी करा : अभिनव मुकुंद

मुकूंद याने दूरदर्शन वर द ग्रेट इंडियन क्रिकेट शो मध्ये बोलताना म्हटलं, भारतात कसोटी मॅच असते तेव्हा सगळे भारताच्या विजयाची अपेक्षा ठेवतातं. पहिल्या कसोटीत स्लॉग स्वीप खेळताना मानेत वेदना होऊ लागल्याने रिटायर्ड हर्ट होत शुभमन गिल मैदानाबाहेर गेला होता. त्याच्या गाई हजेरी मध्ये भारताची फलंदाजी कमजोर दिसून आली. त्यामुळे गिल याच्यावर वाढता दबाव चर्चेचा विषय ठरला आहे.

आयपीएल नंतर शुभमन गिल सातत्याने प्रत्येक फॉरमॅट मध्ये भारताकडून खेळतोय. इंग्लंड मधील पाच सामन्यांची कसोटी मालिका गिल याच्या नेतृत्वात भारताने 2- 2 अशा बरोबरीत सोडवली होती.

भारताकडून सात कसोटी सामने खेळलेल्या अभिनव मुकुंद याने शुभमन गिल सर्व फॉरमॅट मध्ये कॅप्टन होऊ शकतो, त्याच्याकडे ती क्षमता आहे. मात्र, सध्या भारताकडे प्रत्येक फॉरमॅट मध्ये वेगळा कॅप्टन असला पाहिजे . वेगवेगळा कॅप्टन हे समजूतदारपणाचे पाऊल असेल. शुभमन गिल कडे कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. त्याच्यावर खूप दबाव असेल.

दरम्यान, शुभमन गिल याला रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 22 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत शुभमन गिल उपलब्ध आहे की नाही याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.