IND vs SA 2nd Test नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या फलंदाजांना 124 धावांचं आव्हान पार करता आलं नाही. तिकडे मोहम्मद शमीनं रणजी ट्रॉफीत धमाकेदार कामगिरी सुरु ठेवली आहे. त्यामुळं त्याला भारतीय संघातून बोलावणं येणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
कोलकाता येथील पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं भारताला 30 धावांनी पराभूत केलं. टीम इंडियाचा या कसोटी नामुष्कीजनक पराभव झाला. भारताला चौथ्या डावात विजयासाठी 124 धावा करायच्या होत्या. मात्र, सायमन हार्मरच्या दमदार गोलंदाजीपढं भारतीय फलंदाजांचा टिकाव लागला नाही. भारताच्या गोलंदाजांना दुसऱ्या डावात टेम्बा बावुमाची विकेट काढता आली नाही. त्यानं अर्धशतक झळकावलं ते गेमचेंजर ठरलं. त्यामुळं मोहम्मद शमीला पुन्हा टीम इंडियात संधी मिळावी, अशी चर्चा सुरु झाली आहे.
कोलकाता कसोटी अवघ्या तीन दिवसांमध्ये संपली होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताचं पारडं जड होतं. दक्षिण आफ्रिकेच्या 7 विकेट गेल्या होत्या. तेव्हा त्यांची आघाडी 63 धावांची होती. तिसऱ्या दिवशी टेम्बा बावुमाला भारताचा गोलंदाज बाद करु शकला नाही. त्यामुळं आफ्रिकेला भारताविरुद्ध 100 पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळाली. बावुमानं नाबाद 55 धावांची खेळी केली. कोलकाता कसोटीत अर्धशतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज ठरलेला.
रणजीमध्ये मोहम्मद शमीची दमदार कामगिरी
दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध मोहम्मद शमीला संधी देण्यात आली नाही. निवड समितीला त्यामुळं टीकेचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे मोहम्मद शमीनं रणजी ट्रॉफीत दमदार गोलंदाजी केली आहे. 2 मॅचमध्ये 15 विकेट घेतल्या होत्या. पहिल्या कसोटीत भारताचा पराभव झाल्यानं पुन्हा मोहम्मद शमीचं नाव चर्चेत आलं आहे.
बंगालकडून मोहम्मद शमी निवडणूक लढतोय. आसामविरुद्ध खेळताना त्यानं 23.2 ओव्हर गोलंदाजी केली. यात त्यानं 64 धावा देत 3 विकेट घेतल्या आहेत. सूर सिंधू जयस्वालनं देखील 3 विकेट घेतल्या. यामुळं आसामचा संघ 200 धावांवर बाद झाला.
दुसऱ्या कसोटीत शमीला संधी मिळणार?
मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारतीय संघाचा सदस्य नाही. त्यामुळं त्याला गुवाहाटीमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. एखादा खेळाडूची रिप्लेसमेंट म्हणून शमीला संधी मिळू शकते.