World Cup 2023 : विश्वचषकात भारतीय संघापुढे प्रतिस्पर्धी संघ अथिशय फिके दिसून आले. साखळी फेरीत रोहित अॅण्ड कंपनीने नऊ पैकी नऊ सामन्यात विजय मिळवत थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय संघ सर्वच स्तरावर आघाडीवर दिसत आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये भारताला तोड नाही. पण भारतीय संघाची एक कमवूत बाजू समोर आलीय. ही चूक सुधारण्याची संधी रोहित शर्माकडे होती, पण नेदरलँड्सविरोधात ती संधी त्याने गमावली. नेदरलँड्सविरोधात टीम इंडियाने 160 धावांनी विजय मिळवला. पण यामध्ये एक चूक सुधारण्याची संधी रोहित शर्माने सोडली. 


भारतीय संघाची आघाडीची फळी तुफान फॉर्मात आहे. केएल राहुलपर्यंत भारताचे फलंदाज फॉर्मात आहे. प्रत्येकाने धावांचा पाऊस पाडलाय. पण खरा प्रॉब्लेम सूर्यकुमार यादव याच्यावर येऊन थांबतो. आघाडीच्या फलंदाजांनी धावा केल्यामुळे सूर्याला तितकी संधी मिळाली नाही. जर 2019 प्रमाणे भारताची आघाडीची फळी ध्वस्त झाली तर सूर्या ते आव्हान पेलू शकतो का ? हीच चूक सुधारण्याची संधी रोहितकडे होती. नेदरलँड्सविरोधात रोहित शर्माने सूर्याला चौथ्या अथवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवायला हवे होते. सूर्यकुमार यादवला तितक खेळला नाही, पण आता त्यासहच भारतीय संघ सेमीफायनलमध्ये उतरणार आहे. याचा फायदा न्यूझीलंडचा संघ उठवू शकतो. 


सूर्यकुमार यादवला वेळ मिळाला नाही - 


विश्वचषकाच्या प्रत्येक सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. रोहित, गिल, विराट, अय्यर, राहुल… या सगळ्यांनी खूप धावा केल्यात. जडेजानेही फलंदाजीचे योगदान दिले आहे. सूर्यकुमार यादव हा एकमेव फलंदाज आहे ज्याला जास्त वेळ मिळाला नाही. सूर्याला जास्त वेळ खेळपट्टीवर थांबायची संधी मिळाली नाही. सूर्यकुमार यादवने विश्वचषकात ५ सामने खेळले पण त्याने केवळ ७५ चेंडूंचा सामना केला.


रोहितने केली चूक - 


 रोहित शर्मा नेदरलँडविरुद्ध सूर्यकुमार यादवला फलंदाजीची संधी देऊ शकला असता. त्याला वरती फलंदाजीला पाठवता आले असते.  पण त्याने तसे केले नाही. सूर्यकुमार यादवला वर पाठवले असते आणि त्याने मोठी खेळी खेळली असती तर त्याच्यात आत्मविश्वास वाढला असता. सूर्यकुमार यादवमध्ये त्याच्या दिवशी सामना जिंकण्याची ताकद असली तरी, तरीही तुमच्या खात्यात धावा जमा झाल्या तर आत्मविश्वास अधिक राहील.


विश्वचषकात सूर्याची कामगिरी - 
2023 च्या विश्वचषकात सूर्याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आल्या नाहीत. त्याला पाच सामन्यात फक्त 87 धावा करता आल्यात. इंग्लंडविरोधात 49 धावांची सर्वोच्च खेळी केली.  न्यूझीलंडविरोधात भारताची टॉप ऑर्डर फलंदाजी धावा काढेल, अशी आशा आहे. पण जर टॉप ऑर्डर फेल गेली तर सूर्या कशी कामगिरी करणार.. हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.