AUS vs SA 2nd Test: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळल जात आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ 2-0 नं आघाडीवर आहे. मेलबर्न कसोटी सामन्यात दुहेरी शतकं झळकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा (David Warner) 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार जिंकला. डेव्हिड वॉर्नरचं हा 100वा कसोटी सामना होता. डेव्हिड वॉर्नरनं आपल्या 100व्या कसोटी सामन्यात (Melbourne Test) द्विशतक झळकावून रेकॉर्ड बनवला. यापूर्वी डेव्हिड वॉर्नरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला जात होता. याच दरम्यान, डेव्हिड वॉर्नरनं त्याच्या निवृत्तीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय. 


 निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम लावत डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, संघ व्यवस्थापनानं सांगितल्यानंतरच निवृत्तीचा निर्णय घेईल. माझं लक्ष पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे. मी सध्या फिटनेसवर काम करत आहे. याशिवाय, सातत्यानं धावा काढण्यावरही भर देत आहे. पण ज्यावेळी संघ व्यवस्थापन मला निवृत्त होण्यास सांगेल, त्यानंतर मी लगेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणेल. मोठ्या मंचावर चांगली कामगिरी करण्याची क्षमता माझ्यात आहे", असंही डेव्हिड वॉर्नरनं म्हटलंय.


 


डेव्हिड वॉर्नरची कारकीर्द 


डेव्हिड वॉर्नरची कारकिर्द चांगली ठरली आहे. त्यानं 100 कसोटी सामन्यात 46.16 च्या सरासरीनं 8 हजार 122 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 25 शतक आणि 34 अर्धशतकं आहेत. याशिवाय, डेव्हिड वॉर्नरनं एकदिवसीय 141 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6 हजार 7 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 19 शतक आणि 27 अर्धशतकं झळकावली आहेत.


 


ऑस्ट्रेलिया मालिकेत 2-0 नं आघाडीवर


दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियानं 2-0 अशी आघाडी घेतलीय. दरम्यान, ब्रिस्बेन येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेट्सनं धुव्वा उडवला. त्यानंतर मेलबर्न येथे खेळण्यात आलेल्या दुसरा कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियानं 182 धावांनी दक्षिण आफ्रिकेला धुळ चारली. या विजयासह ऑस्ट्रेलियानं मालिका खिशात घातलीय. अखेरचा आणि तिसरा कसोटी सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळला जाणार आहे. 


हे देखील वाचा-