SA vs WI T20I नवी दिल्ली : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याचं म्हटलं जातं. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 26 मार्च 2023 ला झालेली टी 20 मॅच सर्वाधिक धावसंख्येची ठरली होती. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी चौकार षटकारांचा पाऊस पाडला होता. सेंच्युरियनमध्ये झालेल्या मध्ये 517 धावा झाल्या होत्या. त्या सामन्यात 35 षटकार आणि 46 चौकार मारले गेले होते. टी 20 क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या या मॅचमध्ये पार करता आली होती. या मॅचमधील रेकॉर्ड आज देखील कायम असून ते तोडणं अशक्य मानलं जातं.
वेस्ट इंडिजची वादळी फलंदाजी : SA vs WI T20I
23 मार्च 2023 च्या दिवशीचा तो सामना टी 20 मालिकेतील दुसरा होता. वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा फलंदाजी करताना धावसंख्येचा उच्चांक गाठला होता. वेस्ट इंडिजनं 20 ओव्हरमध्ये 258 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजचा टी 20 क्रिकेटमधील तो स्कोअर सर्वाधिक होता.
जॉनसन चार्ल्स यानं 39 धावांमध्ये शतक केलं होतं. वेस्ट इंडिजच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान शतक त्यानं झळकावलं होतं. चार्ल्सनं 46 बॉलमध्ये 118 धावांची खेळी केली होती. ज्यामध्ये 10 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश होता. अलावा काइल मेयर्स यानं 27 बॉलमध्ये 51 धावा आणि रोमारियो शेफर्ड यानं 18 बॉलमध्ये 41 धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेचा विजयी झेंडा
वेस्ट इंडिजनं विजयासाठी ठेवलेली धावसंख्या अशक्य अशी होती. दक्षिण आफ्रिकेनं 7 बॉल शिल्लक ठेवत मॅच जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिा. सलामीवीर क्विंटन डी कॉकनं 15 बॉलमध्ये फिफ्टी पूर्ण केली. यानंतर 43 बॉलमध्ये त्यानं शतक केलं. डीकॉकनं सामन्याचं चित्र पूर्ण पालटलं. रीजा हेंड्रिक्सनं 28 बॉलमध्ये 68 धावा केल्या. डी कॉक आणि हेंड्रिक्सनं सहा ओव्हरमध्येच 102 धावा केल्या. जो त्यावेळेचं टी 20 मधील नवं रेकॉर्ड होतं.
यानंतर कॅप्टन एडेन मार्करम यानं 21 बॉलमध्ये 38 धावा करुन संघाला विजय मिळवून दिला. आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या आहे.
दक्षिण आफ्रिका आणि मोठी धावसंख्या
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केलेला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये 259 धावांचा यशस्वी पाठलाग करणं असो किंवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 438 धावांचा पाठलाग करणं हे दोन विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहेत.
रेकॉर्ड तुटणार? सध्या टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्येचे सामने पाहायला मिळतात. मात्र, 517 धावा, 35 षटकार, 46 चौकार आणि 259 धावांचा यशस्वी पाठलाग करणं हे रेकॉर्ड मोडणं अशक्य मानलं जातंय.