T20 World Cup: टी-20 विश्वचषकात भारतीय संघ स्कॉटलँड संघासोबत पहिल्यांदाच भिडणार आहे. उपांत्य फेरीतील पोहचण्यासाठी भारतीय संघाला मोठ्या विजयाची गरज आहे. अफगाणिस्तानचा 66 धावांनी पराभव केल्यानंतर स्कॉटलँडवरही भारतीय संघ मोठ्या फरकारानं विजय मिळवले अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत आणि स्कॉटलँड विश्वचषकातील आपला चौथा सामना खेळण्यासाठी आज मैदानावर उतरणार आहेत. याआधी झालेल्या तीन सामन्यापैकी भारतीय संघाला दोन सामन्यात पराभव तर एका सामन्यात विजय मिळाला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. तर स्कॉटलँड संघाला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. तिन्ही सामन्यात त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. स्कॉटलँड संघ गुणतालिकेत तळाशी असून उपांत्य फेरीच्या शर्यातीतूनही बाहेर गेला आहे. भारत स्कॉटलँड संघासोबत पहिल्यांदाच टी20 सामना खेळणार आहे. अफगाणिस्तान विरोधातील विजयी भारतीय संघ आज कायम राहण्याची शक्यता आहे. भारताला उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर आज कोणत्याही परिस्थितीत विजयाची नोंद करावी लागेल. 


कुठे अन् केव्हा पाहाल सामना?
भारत आणि स्कॉटलँड यांच्यात होणारा T20 विश्वचषकातील सुपर 12  फेरीतील हा 37 वा सामना आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सामन्याची नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता होईल, तर 7:30 वाजता सामना सुरू होईल.


सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे पाहता येईल?
भारत-अफगाणिस्तान सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या हिंदी आणि इंग्रजी वाहिन्यांवर केले जाईल. तुम्हाला स्टार स्पोर्ट्सवर सामन्याचा आनंद घेता येईल. याशिवाय डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.


ऑनलाइन सामना कसा पाहू शकतो?
या सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहता येईल. याशिवाय, सामन्याशी संबंधित सर्व अपडेट्ससाठी www.abplive.com शी कनेक्ट रहा. येथे तुम्हाला लाइव्ह स्कोअरसह लाइव्ह कॉमेंट्री मिळेल.


संभाव्य भारतीय संघ: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन.
संभाव्य स्कॉटलँड संघ: कायल कोएत्जर (कप्तान), रिची बेरिंगटन, मॅथ्यू क्रॉस (विकेटकीपर), एलेस्डेयर इवांस, क्रिस ग्रीव्स, माइकल लीस्क, कॅलम मॅकलियोड, जॉर्ज मुन्सी, साफयान शरीफ, मार्क वॉट और ब्रेडली व्हील.