New Zealand Test squad for India: न्यूझीलँड क्रिकेट मंडळाने भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठीचा संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडचा संघ भारताविरोधात दोन कसोटी खेळणार आहेत. पुढील महिन्यात कसोटी मालिका होणार आहे. न्यूझीलँडने आपल्या १५ सदस्यीय संघात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याचा समावेश केला नाही. भारतातील खेळपट्टी पाहता किवींनी पाच फिरकीपटूंचा समावेश आपल्या संघात केला आहे. 


सध्या सुरू असलेली टी-२० विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर किवींचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. न्यूझीलँडच्या भारत दौऱ्याची सुरुवात १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टी-२० सामन्याने होणार आहे. 


भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठी न्यूझीलँडच्या संघात एजाज पटेल, विल सोमरविले आणि मिशेल सेंटनर हे तीन प्रमुख फिरकीपटू असणार आहेत. त्याशिवाय, रचिन रविंद्र आणि ग्लेन फिलिप्स यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू फिरकीपटू आहेत. 


किवींच्या संघाचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोम यांनी सातत्याने बायो बबलमध्ये राहण्यास लागत असल्यामुळे या दौऱ्यातून माघार घेण्याची तयारी दर्शवली. न्यूझीलँड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले की, या दोन्ही खेळाडूंनी भारत दौऱ्यासाठी उपलब्ध होणार नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. 


न्यूझीलँडचा संघ भारत दौऱ्यात तीन टी-20 सामना खेळणार आहे. तर, दोन कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे. पहिली कसोटी कानपूर येथे होणार असून दुसरी कसोटी मुंबई होणार आहे. 


भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठी न्यूझीलँडचा संघ


केन विलियम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टिरक्षक), डेवोन कॉनवे, काइल जॅमीसन, टॉम लॅथम, हेनरी निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनर, विल सोमरविले, टीम साउथी, रॉस टेलर, विल यंग आणि नील वॅगनर


संबंधित बातम्या:


WI Vs SL, Match Highlights: गेल पुन्हा फेल; श्रीलंकेचा वेस्ट इंडीजवर 20 धावांनी विजय