ICC T20 World Cup : क्रिकेटचा अर्थच नवीन विक्रम प्रस्थापित करणे आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचे बिगुल वाजले आहे. टी -20 विश्वचषकाचा पहिला हंगाम 2007 साली झाला. हा असा हंगाम होता जिथे क्रिकेटच्या इतिहासात अनेक नवीन विक्रम झाले आणि अनेक विक्रम मोडले गेले. वर्ल्ड कपमधील पाच विक्रम असे आहेत, जे आज मोडणे कदाचित कठीण आहे. या पाच रेकॉर्डबद्दल जाणून घेऊया.
सर्वाधिक फलंदाजीची सरासरीटी -20 मध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करण्याचा विक्रम भारताच्या विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 16 सामन्यात 86.33 च्या सरासरीने 777 धावा केल्या आहेत. या प्रकारात एकही टी 20 फलंदाज नाही त्याच्या आसपासही नाही. विराटचा हा विक्रम मोडणे कोणत्याही फलंदाजाला सोपं जाणार नाही.
सर्वात वेगवान शतकख्रिस गेलने टी -20 T20 World Cup मध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. 2016 च्या विश्वचषकात गेलने केवळ 48 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या टी 20 विश्वचषकात गेलचा हा विक्रम मोडणे कोणत्याही फलंदाजाला सोपे जाणार नाही.
सर्वोच्च भागीदारीश्रीलंकेच्या महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) आणि कुमार संगकाराने (Kumar Sangakkara) 2010 च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी 166 धावांची भागीदारी करून एक नवा विक्रम निर्माण केला. हा विक्रम अद्याप कोणीही मोडू शकलेला नाही.
एका डावात सर्वाधिक षटकारटी -20 विश्वचषकाच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने 2016 च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध एका डावात 11 षटकार ठोकले होते. टी -20 विश्वचषकात त्याचा विक्रम मोडणे खूप कठीण वाटते.
सर्वाधिक संघाचा स्कोअर2007 च्या टी -20 विश्वचषकात श्रीलंकेने केनियाविरुद्ध 6 बाद 260 धावांची मोठी धावसंख्या उभारली. विश्वचषकातील कोणत्याही संघाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. श्रीलंकेने केलेला हा विक्रम आतापर्यंत कोणत्याही संघाला मोडता आलेला नाही. तसे, क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणतात. या विश्वचषकात कोण हे विक्रम मोडू शकतो ते पाहूया.