T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यापासून टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेशी टी-20 मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला उद्यापासून (20 सप्टेंबर 2022) सुरुवात होईल. यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) भारताच्या टॉप-3 फलंदाजांबाबत मोठं वक्तव्य केलंय. 


भारतानं जिंकलेल्या दोन विश्वचषकात महत्वाची भूमिका बजावणारा गौतम गंभीर म्हणाला की, जेव्हा तुम्ही मोठी स्पर्धा खेळायला जातात, त्यावेळी कोणत्याही खेळाडूच्या प्रदर्शनापेक्षा संघाच्या विजयाचा विचार केला पाहिजे. केएल राहुल हा रोहित शर्मा-विराट कोहलीच्या तुलनेत अधिक कौशल्यपूर्ण असल्याचं गंभीर म्हटलंय.


गौतम गंभीर काय म्हणाला?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीर म्हणाला की, "आशिया चषकात विराट कोहलीनं शतक झळकवताच प्रत्येकजण त्याचं कौतूक करताना दिसत आहे. तसेच आपण सर्वजण केएल राहुल आणि रोहित शर्मानं संघासाठी दिलेल्या योगदानाबद्दल विसरायला सुरुवात केलीय, जे दिर्घकाळापासून चांगली कामगिरी करत आहेत. दरम्यान, अचानक विराट कोहलीला सलामीला पाठवण्याच्या चर्चांना सुरुवात झालीय. परंतु, याचा केएल राहुलच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल? मोठ्या स्पर्धेपूर्वी आपल्या आघाडीच्या फलंदाजाला दबावापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. विशेषत: केएल राहुलसारखा फलंदाज ज्याच्याकडं विराट कोहली आणि रोहित शर्माच्या तुलनेत अधिक कौशल्य आहे. हे आपण आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा पाहिलं आहे." 


विराटच्या सलामीबाबत मॅथ्यू हेडनची प्रतिक्रिया
विराट कोहलीनं सलामीला फलंदाजीला यावं की नाही? या प्रश्नावर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडननं त्याचं मत मांडलं. हेडन म्हणाला की, "विराट कोहलीला आपण सर्वजण ओखळतो, तो ऐक महान क्रिकेटर आहे, याचं कोणााताही पुरवा देण्याची गरज नाही. विराट कोहली वेगवान गोलंदाजांविरुद्ध चांगली फलंदाजी करतो. ऑस्ट्रेलियाच्या संघात वेगवान गोलंदाजांची संख्या अधिक आहे. मधल्या षटकात एडम झम्पावर मोठी जबाबदारी असते. मिचेल मार्शही घातक गोलंदाज आहे. तो विराटला आपल्या जाळ्यात अडकवू शकतो. मला असं वाटतं की विराट कोहलीनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी यावं. सध्या केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये नाही. परंतु, त्याच्या फलंदाजीबाबत शंका केली जाऊ शकत नाही."


हे देखील वाचा-