नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्याकडून टी  20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. या टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ जाहीर झालेला आहे. या वर्ल्डकपची सुरुवात  7 फेब्रुवारीपासून होणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून लवकरच टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केला जाऊ शकतो. विशेष बाब म्हणजे, ऑस्ट्रेलिया गेल्या टी 20 वर्ल्ड कपनंतर एकही आंतरराष्ट्रीय टी 20 सामना न खेळलेल्या  पॅट कमिन्सला संघात स्थान देण्याची शक्यता आहे. तर, जोश हेजलवूड आणि टीम डेविडला देखील भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या वर्ल्डकपसाठी संधी दिली जाऊ शकते.

Continues below advertisement

ऑस्ट्रेलिया तीन अनफिट खेळाडूंना संधी देणार? 

पॅट कमिन्स दुखापतग्रस्त असल्यानं तो बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. कमिन्सच्या कमरेचं स्कॅनिंग केल्यानंतर तो टी 20 वर्ल्ड कपसाठी फिट आहे की नाही याचा निर्णय होईल. मात्र, जोश हेजलवूड आणि टिम डेविड देखील फिट नाहीयेत मात्र, त्यांना संघात स्थान दिलं जाऊ शकतं.

टिम डेविड बिग बॅश लीग म्हणजे बीबीएलमधून बाहेर गेला आहे. मात्र, तो टी 20 वर्ल्ड कपपर्यंत फिट होऊ शकतो. यामुळं त्याला प्रोव्हिजनल संघत स्थान मिळू शकतं. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्यू मॅकडोनाल्ड यांनी 15 जणांना टीममध्ये निवडणार आहे. आयसीसीनं संघ जाहीर करण्यासाठी 2 जानेवारी  2026 मुदत दिली आहे. 

Continues below advertisement

पॅट कमिन्सनं जुलै 2025 नंतर केवळ एक कसोटी खेळली आहे. अॅशेसच्या ऑस्ट्रेलियाच्या संघातून बाहेर होण्याचा निर्णय पॅट कमिन्सनं घेतला. 

अँड्यू मॅकडोनाल्ड यांनी पुढच्या चार आठवड्यात पॅट कमिन्सचं स्कॅनिंग केलं जाईल. यामध्ये वर्ल्ड कपसाठी तो फिट आहे की नाही याची माहिती  मिळेल. जोश हेजलवूडनं टी 20 मध्ये भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. तो सध्या दुखापतीमुळं अॅशेसमधून बाहेर गेला होता. मात्र, तो टी 20 वर्ल्ड कपपर्यंत फिट होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांना जोश हेजलवूड आणि टिम डेविड टी 20 वर्ल्ड कपपर्यंत फिट होतील, अशी अपेक्षा आहे.

 दरम्यान, भारतानं टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केला आहे. टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचं नेतृत्त्व सूर्यकुमार यादव करणार आहे.