IND vs ENG Semi Final LIVE Score : दोन तासांच्या पावसाच्या व्यत्ययानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यासाठी नाणेफेक झाली. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नॉकाऊट सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. इंग्लंडने मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवलाय. 


रोहित शर्माने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा विचार होता असं सांगितलं. सध्याची गयानामधील परिस्थिती चांगली आहे, त्यामुळे आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार होता. भारतीय संघाने आपल्या प्लेईंग 11 मध्येही कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यातील प्लेईंग 11 उतरवण्यात आली आहे. 


भारताच्या ताफ्यात कोण कोण ? 


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत,  शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह


इंग्लडच्या ताफ्यात कोण कोण ?


फिलिप साल्ट, जोस बटलर (कर्णधार), मोइन अली,  जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, आदिल रशीद, रीस टॉपले, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर


हेड टू हेड आकडे काय सांगतात ? India vs England Head To Head 


भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये टी20 मध्ये काटें की टक्कर पाहायला मिळाली. दोन्ही संघामध्ये आतापर्यंत 23 टी20 सामने झाले आहेत. भारताने 12 सामन्यात बाजी मारली आहे, तर इंग्लंडने 11 सामने जिंकले आहेत. विश्वचषकात न्यूट्रल ठिकाणी भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. यामध्ये भारताने दोन तर इंग्लंडने एका सामन्यात विजय मिळवलाय.


भारत विरुद्ध इंग्लंड पिच रिपोर्ट


प्रोव्हिडेंस स्टेडियम, गयानामधील खेळपट्टी (Providence Stadium Pitch Report) गोलंदाजांसाठी पोषक मानली जाते. फिरकी आणि वेगवान गोलंदाजांना या मैदानावर चांगली मदत मिळते.  पहिल्या चेंडूपासून मोठे फटके मारणं तितके सोपं नसेल. कारण, विस्फोटक फलंदाजी करताना विकेट जाण्याची शक्यता आहे. गोलंदाजांना या खेळपट्टीवर जास्त मदत मिळत आहे. फिरकी गोलंदाजांना खासकरुन जास्त मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मधल्या षटकात कोणता संघ जास्त धावा काढतो, त्यावर सामन्याचा निकाल लागू शकतो. टी20 विश्वचषक 2024 मध्ये या मैदानावर आतापर्यंत पाच सामन झालेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या संघाला तीन वेळा विजय मिळलाय.