IND vs ENG Toss Update : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये गयाना येथे उपांत्य सामना होणार आहे. पण पावसामुळे सामन्यात व्यत्यय आलाय. पावसामुळे नाणेफेकीलीहा उशीर झालाय. गयानामध्ये मागील तासभरापासून पावसाची उघडझाप सुरु आहे. बीसीसीआयकडूनही सामन्याबाबात अपडेट देण्यात आली असून नाणेफेक उशीरा होणर असल्याचं सांगण्यात आलेय.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पावसामुळे उशीरा सुरु होणार आहे. काही वेळापूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती. नाणेफेक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली, त्यामुळे कव्हर्स पुन्हा एकदा मैदानावर झाकण्यात आले आहेत. गयानामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाची रिमझिम खेळी सुरु आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा पाहावी लागत आहेत. मैदानातील कर्मचाऱ्यांनाही कव्हर्स काढण्यासाठी आणि टाकण्यासाठी धावफळ होत आहे.
250 मिनिटांचा नियम
दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी आयसीसीकडून राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. सामना पावसामुळे अथवा इतर कोणत्या कारणामुळे प्रभावित झाला तर 4 तासांचा अतिरिक्त वेळ देण्यात आलाय.
षटकं कधी कमी होणार ?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना रात्री आठ वाजता सुरु होणार होता. पण पावसामुळे अद्याप नाणेफेकही झाली नाही. दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी आयसीसीकडून वेगळे नियम ठेवण्यात आले आहेत. भारतीय वेळेनुसार, 12.10 मिनिटांनंतर षटकामध्ये कपात केली जाईल.
उपांत्य सामना कमीत कमी दहा षटकांचा घेण्यात यावा, असा नियम करण्यात आलाय. 10-10 षटकांसाठीचा कटआऊफ टाईम 1.44 इतका ठेवण्यात आला. जर सामना रद्द झाला तर भारताला विजयी घोषित करण्यात येईल.