T20 World Cup 2024 Ind Vs Pak: टी-20 विश्वचषकात उद्या (9 मे रोजी) भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यात सामना रंगणार आहे. भारतीय संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात आयर्लंडविरुद्ध शानदार विजयाने केली. तर पाकिस्तानचा अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताविरुद्ध पाकिस्तानला विजय मिळवणं आवश्यक असणार आहे. तसेच भारतही पाकिस्तानचा पराभव करत सुपर-8 मधील प्रवेशाचा मार्ग सुकर करेल. 


भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात नाणेफेक महत्वाची ठरणार आहे. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan Match) यांच्यातील आततापर्यंतच्या 12 सामन्यात 9 वेळा प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. अशा स्थितीत उद्या न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या विश्वचषक 2024 च्या महान सामन्याचा विजेता नाणेफेक जिंकणारा संघ होईल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


भारत-पाकिस्तान सामन्यात टॉस का महत्त्वाचा? (India vs Pakistan Match)


न्यू यॉर्कमध्ये नव्याने बांधलेल्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये ड्रॉप-इन खेळपट्टी वापरली जात आहे, जी ऑस्ट्रेलियातून आयात केली गेली आहे आणि जमिनीवर बसवली आहे. अशा खेळपट्ट्या सेट होण्यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागतो, परंतु घाईघाईने तयार केलेल्या खेळपट्ट्यांवर जोरदार टीका होत आहे. टी-20 विश्वचषकात सकाळपासून सुरू होणाऱ्या सामन्यात गोलंदाजांची मदत मिळत आहे, पण जसजसा दिवस सरत आहे, तसतशी सूर्यप्रकाशामुळे फलंदाजी करणे सोपे होत आहे, त्यामुळे येथेही नंतर फलंदाजी करणे फायदेशीर ठरेल.






न्यूयॉर्कमधील खराब स्टेडियमवर आयसीसीचे विधान


भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामन्याच्या एका दिवसानंतर, आयसीसीने गुरुवारी एक निवेदन जारी केले. निवेदनात म्हटले आहे- "नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आतापर्यंत वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्या अपेक्षेप्रमाणे नाहीत."उर्वरित सामन्यांसाठी चांगली खेळपट्टी तयार करता येईल", असंही आयसीसीने म्हटलं आहे.


भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-


भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.


पाकिस्तान संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-


पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद अमीर, हरिस रौफ आणि नसीम शाह.