T20 World Cup 2024 IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज दुसरा उपांत्य सामना होत आहे. गयानामध्ये भारतीय वेळेनुसार, रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. गयानामध्ये हा सामना सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे. आता गयानामधील वातावरण कसेय? पाऊस पडतोय का? याची चर्चा सुरु आहे. क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी गयानामधून क्रिकेट चाहत्यांना एक खूशखबर दिली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययानंतरही पूर्ण होईल, असा अंदाज आहे. त्यांनी गयानामधून हवामानाच खास रिपोर्ट सांगितलाय. पाहूयात त्यामध्ये नेमकं काय आहे? 


गयानामधील हवामान रिपोर्ट काय सांगतो ?  (Guyana Weather Forecast On 27th June) 


भारत आणि इंग्लंड या सामन्याची प्रतिक्षा गयानामध्येच नाही, तर सगळ्या जगभरात आहे.  गयानामध्ये पाऊस आहे का? असा सर्वांना प्रश्न असेल. गयानामध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरु आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामना धुतला जाणार नाही, असा पाऊस असा राहणार असल्याचं समजलेय. सकाळी आठ वाजण्याच्या आसपास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय दुपारी 1 वाजताही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पण आयसीसीने या सामन्यासाठी चार तास अतिरिक्त ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे हा सामना पाऊस पूर्ण होईल, असं संयोजक आणि हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.



दरम्यान, उपांत्य सामना कमीतकमी 10 षटकांचा व्हायला हवा, असा नियम आहे. जर उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाला तर टीम इंडिया थेट फायनलमध्ये जाणार आहे.


भारत विरुद्ध इंग्लंड पिच रिपोर्ट ( India vs England Pitch Report)


प्रोव्हिडेंस स्टेडियम, गयानामधील खेळपट्टी (Providence Stadium Pitch Report) गोलंदाजांसाठी पोषक मानली जाते. फिरकी आणि वेगवान गोलंदाजांना या मैदानावर चांगली मदत मिळते.  पहिल्या चेंडूपासून मोठे फटके मारणं तितके सोपं नसेल. कारण, विस्फोटक फलंदाजी करताना विकेट जाण्याची शक्यता आहे. गोलंदाजांना या खेळपट्टीवर जास्त मदत मिळत आहे. फिरकी गोलंदाजांना खासकरुन जास्त मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मधल्या षटकात कोणता संघ जास्त धावा काढतो, त्यावर सामन्याचा निकाल लागू शकतो. टी20 विश्वचषक 2024 मध्ये या मैदानावर आतापर्यंत पाच सामन झालेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या संघाला तीन वेळा विजय मिळलाय. त्यामुळे नाणेफेक महत्वाची ठरणार आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या 127 इतकी होती, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणार्या संघाची सरासरी धावसंख्या 95 इतकी आहे.