India vs South Africa Live Score T20 WC final :भारताच्या 176 धावा, जसप्रीत बुमराह-अर्शदीपकडून आफ्रिकेला धक्के

T20 World Cup 2024, IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवण्यासाठी लढणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघ सज्ज झाला आहे.

युवराज जाधव Last Updated: 29 Jun 2024 11:32 PM
भारताने चषकावर नाव कोरले

भारताने चषकावर नाव कोरले....  2007 नंतर भारताने मैदान मारले

कगिसो रबाडा बाद

भारताला आठवं यश...  हार्दिक पांड्याचा भेदक मारा... 

सूर्याचा जबराट झेल

सूर्यकुमार यादवने शानदार झेल घेतला. डेविड मिलर झेलबाद झालाय. दक्षिण आफ्रिकेच्या आशावर पाणी फेरले... मिलर 21 धावांवर बाद झाला.. भारत विजयापासून तीन पावले दूर

सामना रोमांचक स्थितीमध्ये

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना रोमांचक स्थितीमध्ये पोहचलाय. एका षटकात 16 धावांची गरज आहे.. 

दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का

मार्को यान्सनचा बुमराहने उडवला त्रिफाळा...  सामन्यात रंगत वाढली...

हार्दिक पांड्यानं क्लासेनला तंबूत पाठवले

धोकादायक हेनरिक क्लासेन याला तंबूत पाठवत हार्दिक पांड्याने मोठं यश मिळवून दिलेय. क्लासेन यानं 27 चेंडूत 52 धावा केल्या. 

अक्षरची कुटाई

हेनरिक क्लासेनच्या वादळी अर्धशतकामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहे. क्लासेन याने 23 चेंडूत अर्धशतक ठोकलेय. अक्षर पटेलच्या एका षटकात क्लासेन याने 22 धावा वसूल करत सामना फिरवला.

दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का

क्विंटन डी कॉकला बाद करत अर्शदीप सिंहने भारताला चौथे यश मिळवून दिले. डी कॉक 39 धावा काढून बाद झाला. आफ्रिका 4 बाद 106 धावा

भारताला विजयासाठी सात विकेटची गरज

10 षटकानंतर दक्षिण आफ्रिका 3 बाद 81 धावा... क्विंटन डी कॉक 30 धावा काढून खेळथ आहे. त्याच्या जोडीला हेनरिक क्लासेन मैदानात आहे. 10 षटकांमध्ये भारतीय संघाने तीन विकेटच्या मोबदल्यात 75 धावा केल्या होत्या. सामना अतीशय अटीतटीचा सुरु आहे. 

सामना रोमांचक स्थितीमध्ये

सामना रोमांचक स्थितीमध्ये पोहचलाय.  दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 61 चेंडूमध्ये 97 धावांची गरज आहे. भारताला विजयासाठी सात विकेट गरजेच्या. 

अक्षरचा भेदक मारा

अक्षर पटेलने स्टब्सचा त्रिफाळा उडवत भारताला तिसरे यश मिळवून दिले. स्टब्स 31 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने एक षटकार आणि तीन चौकार ठोकले. आफ्रिका 3 बाद 70 धावा... 

क्विंटन डी कॉक आणि स्ट्रिस्टन स्टब्सने डाव सावरला

क्विंटन डी कॉक आणि स्ट्रिस्टन स्टब्सने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. अवघ्या 12 धावांवर आफ्रिकेचे दोन महत्वाचे फलंदाज तंबूत परतले होते. कर्णधार माक्ररम आणि रीजा हेंड्रिक्स स्वस्तात तंबूत परतले होते. पण त्यानंतर स्टब्स आणि डी कॉक यांनी आफ्रिकेच्या डावाला आकार दिला. अर्धशतकी भागिदारी केली. स्टब्स 31 आणि कॉक 28 धावांवर खेळत आहेत. 

दक्षिण आफ्रिकेच्या 6 ओव्हरमध्ये 2 बाद 42 धावा

दक्षिण आफ्रिकेनं 6 ओव्हरमध्ये 2 बाद 42 धावा केल्या आहेत. क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्सनं  आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

अर्शदीपचा दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का, कॅप्टन एडन मार्क्रम बाद

अर्शदीपनं दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का दिला आहे, कॅप्टन एडन मार्क्रम बाद केलं आहे.

Jasprit Bumrah : भारताचा दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का, बुमराहनं करुन दाखवलं

जसप्रीत बुमराहनं दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. हेन्ड्रिक्सला  चार धावांवर जसप्रीत बुमराहनं बाद केलं.

दक्षिण आफ्रिकासमोर 177 धावांचं आव्हान

विराट कोहलीचं संयमी अर्धशतक, अक्षर पटेलची झंझावाती खेळीच्या बळावर टीम इंडियाने 20 षटकात 7 विकेटच्या मोबदल्यात 176 धावांचा पाऊस पाडलाय. शिवम दुबे यानेही निर्णायक 27 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकाकडून एनरिख नॉर्खिया आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय गोलंदाजांना 177 धावांचा बचाव करायचा आहे. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज पहिला विश्वचषक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

भारताला सहावा धक्का

शिवम दुबे 27 धावांवर बाद झालाय. भाताला सहावा धक्का बसलाय. 

विराट कोहली बाद

विराट कोहलीच्या रुपाने भारताला मोठा धक्का बसलाय. विराट कोहली 76 धावा काढून बाद झालाय. भारत 5 बाद 163 धावा

विराट कोहलीचे अर्धशतक

रनमशीन विराट कोहलीने शानदार अर्धशतक ठोकलेय. विराट कोहलीने 48 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलेय.  लागोपाठ विकेट गेल्यानंतर विराट कोहलीला मोठा फटका मारता आला नाही. त्याला एकही चौकार ठोकता आला नाही.

अक्षर पटेलचा झंझावत, फक्त तीन धावांनी अर्धशतक हुकले 

अष्टपैलू अक्षर पटेल यानं निर्णायक फलंदाजी करत टीम इंडियाचा डावाला आकार दिला. 34 धावांवर तीन विकेट... अशा खराब स्थितीमध्ये असताना अक्षर पटेल यांनी झंझावाती फलंदाजी करत डाव सावरला. विराट कोहलीनं एकेरी दुहेरी धाव घेत अक्षर पटेलची चांगली साथ दिली. अक्षर पटेल यानं 31 चेंडूमध्ये 47 धावांची खेळी केली. या खेळीला एक चौकार आणि चार षटकारांचा साज होता. अक्षर पटेल यानं विराट कोहलीसोबत 72 धावांची भागिदारी केली. अक्षर पटेलच्या झंझावाती फलंदाजीमुळे टीम इंडियाची धावसंख्या झटपट वाढली. अक्षर पटेल याचं अर्धशतक फक्त तीन धावांनी हुकले, पण त्यानं आपलं काम चोख बजावले. झटपट विकेट पडल्यामुळे अक्षर पटेल याला फलंदाजीत प्रमोशन देण्यात आले होते, याचं त्यानं सोनं केलं. 

भारताला चौथा धक्का

अक्षर पटेलची झंझावती खेळी संपली.... अक्षर पटेलने 31 चेंडूत 47 धावांची वादळी खेळी केली. अक्षर पटेलचं अर्धशतक तीन धावांनी हुकले. भारत 4 बाद 106 धावा

विराट-अक्षरची अर्धशतकी भागिदारी

विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी अर्धशतकी भागिदारी केली आहे. 34 धावांवर तीन धक्के बसल्यानंतर दोघांनी टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. अक्षर पटेल 26 चेंडूत 3 षटकाराच्या मदतीने 38 धावांवर खेळत आहे. तर विराट कोहली 35 चेंडूत 41 धावांवर खेळत आहे. 12 षटकानंतर भारत तीन बाद 93 धावा

विराट-अक्षरने डाव सावरला

धडाधड तीन विकेट पडल्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी टीम इंडियाचा डाव सावरलाय. 10 षटकानंतर भारत 3 बाद 75 धावा. विराट कोहली 36 तर अक्षर पटेल 26 धावांवर खेळत आहे. रोहित शर्मा 9, सूर्यकुमार यादव 3 आणि ऋषभ पंत 0 धावांवर बाद झाला. आफ्रिकाकडून कगिसो रबाडाने एक तर केशव महाराजने दोन विकेट घेतल्या.

विराट कोहली आणि अक्षर पटेलनं डाव सावरला - 

भारताला 34 धावांवर तीन धक्के बसल्यानंतर विराट कोहलीने अक्षरच्या साथीने टीम इंडियाचा डाव सावरला. विराट कोहलीने एका बाजूने संयमी फलंदाजी केली, दुसऱ्या बाजूला अक्षर पटेल याने फटकेबाजी करत धावसंख्येला आकार दिला. अक्षर पटेल आणि विराट कोहली यांच्यामध्ये आतापर्यंत 35 धावांची भागिदारी झाली आहे.अक्षर पटेल 18 चेंडूत 25 धावांवर खेळत आहे. त्यामध्ये दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. तर विराट कोहली 27 चेंडूमध्ये 32 धावांवर खेळत आहे. यामध्ये चार चौकारांचा समावेश आहे. 

भारताला तिसरा धक्का

भारताला धक्यावर धक्के.. सूर्यकुमार यादवही तंबूत परतलाय. 34 धावांवर भारताला तसरा धक्का बसलाय. सूर्यकुमार यादव फक्त 4 चेंडूत तीन धावा काढून बाद झालाय. विराट कोहलीकडून लढा सुरुच

विराटची दमदार फलंदाजी

रोहित शर्मा आणि ऋषभ पंत लागोपाठ तंबूत परतल्यानंतर विराट कोहलीने संयमी फलंदाजी सुरु केली आहे. विराट कोहलीने अनुभव पणाला लावत टीम इंडियासाठी मैदानात उभा राहिलाय. विराट कोहली 21 धावांवर खेळत आहे. भारत 2 बाद 32 धावा

2007 च्या टी20 विश्वचषकात काय झालं ? 

2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने टी20 विश्वचषकावर नाव कोरले होते. पाकिस्तानचा पराभव  करत भारताने पहिल्या टी20 विश्वचषकावर नाव कोरले होते. पण त्यावेळी एमएस धोनीने नाणेफेक (In 2007 T20I WC final - India won the toss, Decided to bat first & won the match) जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करतना 157 धावा केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानला 152 धावांवर रोखले होते. भारताने हा सामना पाच धावांनी जिंकला होता. या सामन्यात रोहित शर्माने 16 चेंडूत 30 धावांची निर्णायक खेळी केली होती. 2024 टी20 विश्वचषकात रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे. उपांत्य सामन्यात रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली होती. आजही रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. 2024 टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आहे. आता चषकही भारत उंचावणार का? याचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे.  2024 आणि 2007 टी20 विश्वचषकाची फायनल खेळणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू ठरणार आहे. 

भारताला लागोपाठ दुसरा धक्का

ऋषभ पंतच्या रुपाने भारताला दुसरा धक्का बसलाय. केशव महाराजने एकाच षटकात घेतल्या दोन विकेट... 

भारताला पहिला धक्का

रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला आहे. रोहित शर्मा 4 चेंडूवर 9 धावा काढून तंबूत परतलाय. 

दक्षिण अफ्रिकाच्या ताफ्यात कोण कोण?

क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, एडेन मार्कराम (कर्णधार), ट्रस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन  डेविड मिलर, मार्को यानसेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे आणि तबरेज़ शम्सी.

भारताची प्लेईंग 11-

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह. 

भारताने नाणेफेक जिंकली

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

भारत की दक्षिण आफ्रिका? विश्वचषकावर कोण नाव कोरणार? याचं उत्तर आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे. थोड्याच वेळात नाणेफेक होणार आहे. 

टी20 विश्वचषकाचा नवा विजेता कोण होणार, भारत की दक्षिण आफ्रिका?

टी20 विश्वचषकाचा नवा विजेता कोण होणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरु होईल. ट्वेन्टी ट्वेन्टी किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे. पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांनी यंदाच्या विश्वचषकात प्राथमिक आणि अव्वल साखळीवरही आपला ठसा उमटवला. हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. त्यामुळं यंदाचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक कोण जिंकतो, याकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे.

कर्णधाराची भूमिका विजयात निर्णायक

विश्वचषकासारख्या सर्वोच्च व्यासपीठावर कर्णधाराची भूमिका ही विजयात निर्णायक ठरते. यंदाचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकही त्याला अपवाद नाही. या विश्वचषकाच्या निमित्तानं भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रम यांचं नेतृत्त्व उजळून निघालंय. दोघांनी एक फलंदाज म्हणूनही आपापल्या संघाच्या अंतिम फेरीपर्यंतच्या वाटचालीत मोलाची भूमिका निभावलीय. दक्षिण आफ्रिकेनं आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच टी20 विश्वचषकाची फायनल गाठलीय. भारतानं टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारण्याची ही तिसरी वेळ आहे. 2007 साली भारतानं पाकिस्तानला हरवून टी20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर 2014 सालच्या टी20 विश्वचषकात भारताला फायनलमध्ये श्रीलंकेकडून हार स्वीकारावी लागली होती.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील फायनलचा खास रिपोर्ट

भारत विश्वचषकावर नाव कोरणार - शोएब अख्तर

भारताने कधी कधी आयसीसी स्पर्धा जिंकली ?

1983 चा विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाला आयसीसी चषक जिंकण्यासाठी खूप वाट पाहावी लागणार आहे. तब्बल दोन दशकानंतर भारतीय संघाला आयसीसीचं जेतेपद मिळाले होते. 2002 मध्ये श्रीलंकेसोबत भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. पावसामुळे चॅम्पियन चषकाच्या फायनलमध्ये पावसाने हजेरी लावली होत. मुसळधार पावसामुळे हा सामना अनिर्णित सोडण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघाला संयुक्त जेतेपद देण्यात आले. त्यानंतर 5 वर्षांनंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली  भारताने 2007 टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला. अशा प्रकारे टीम इंडियाने तिसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली.


भारताला चौथ्या आयसीसी स्पर्धेवर नाव कोरण्यास जास्त वेळ लागला नाही. चार वर्षानंतर झालेल्या वनडे विश्वचषकावर नाव कोरले. 2011 मध्ये भारतात झालेल्या वनडे विश्वचषकात एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारताने संघाने श्रीलंकेचा पराभव करत चषकावर नाव कोरले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षानंतर झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीवर भारताने नाव कोरले. त्यावेळीही संघाची धुरा एमएस धोनी याच्या खांद्यावर होती. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप, टी20 वर्ल्डकप आणि चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलेय. भारताकडे दोन वनडे वर्ल्डकप, एक टी20 वर्ल्डकप आणि दोनवेळा चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरले आहे. 2013 नंतर भारतीय संघाला आयसीसी चषकावर नाव कोरता आलेले नाही. 

दोन्ही संघ स्टेडियममध्ये

फायनल खेळण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ बारबाडोस स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानात

T20 World Cup 2024 IND vs SA Final : टी20 विश्वचषकाचा नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरु होईल. टी20 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे. पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांनी यंदाच्या विश्वचषकात प्राथमिक आणि अव्वल साखळीवरही आपला ठसा उमटवला. हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. त्यामुळं यंदाचा टी20 विश्वचषक कोण जिंकतो, याकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे. भारतानं टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारण्याची ही तिसरी वेळ आहे. 2007 साली भारतानं पाकिस्तानला हरवून टी20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर 2014 सालच्या टी20 विश्वचषकात भारताला फायनलमध्ये श्रीलंकेकडून हार स्वीकारावी लागली होती. पण आयसीसीच्या स्पर्धेत मागील पाचवेळा भारतीय संघ जेव्हा जेव्हा फायनलला पोहचलाय, त्यावेली स्वप्न भंगलेय. हेच कोडं सोडवण्याची संधी आज पुन्हा एकदा भारताकडे आलेली आहे. 



बारबाडोसमध्ये सध्या कसेय वातावरण?

भारत-आफ्रिका पहिल्यांदाच फायनलमध्ये आमनेसामने

रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी निर्णायक सामना

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची फायनल जिंकून दिल्यास त्यांच्या नावांचा विचार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी होऊ शकतो. 

रोहित शर्माच्या नावे अनोखा विक्रम

रोहित शर्मा आयसीसीच्या कसोटी, वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये कॅप्टनसी भूषवणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. 

राहुल द्रविड यांची कोच म्हणून अखेरची मॅच

राहुल द्रविड यांची टीम इंडियाचे कोच म्हणून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही मॅच अखेरची असेल.  

शिवम दुबेला डच्चू की संजू सॅमसनला संधी?

शिवम दुबेला आणखी एक संधी दिली जाणार की  संजू सॅमसनला रोहित शर्मा संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

गुरबाझ टॉपवर रोहित तिसऱ्या स्थानी

रहमानुल्लाह गुरबाझनं टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सर्वाधिक 281 धावा केल्या आहेत. तर,  रोहित शर्मानं 248 धावा केल्या असून तो तिसऱ्या स्थानी आहे. ट्रेविस हेड 255 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.

T20 WC Final : रोहित शर्माची मदार गोलंदाजीवर

भारताच्या वेगवान आणि फिरकीपटूंनी दमदार गोलंदाजी केलेली आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये विजेतेपद पटकावयचं असल्यास जसप्रीत बुमराह,  हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, अक्षर पटेल यांची भूमिका महत्त्वाची असेल. 

Virat Kohli : विराट कोहलीला स्थान मिळणार

विराट कोहलीला भारतीय संघात स्थान मिळणार आहे. विराट कोहलीचा फॉर्म चांगला नसली तरी त्याचा अनुभव पाहता त्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

Ind vs SA : भारत 17 वर्षानंतर इतिहास रचणार

टीम इंडियाकडे 17 वर्षानंतर पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. भारतानं पहिल्यांदा 2007 मध्ये विजेतेपद मिळवलं होतं. 

T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिका पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत

दक्षिण आफ्रिका पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत पोहोचली आहे. भारताविरुद्ध विजय मिळवण्याच्या इराद्यानं एडन मार्क्रमचा संघ मैदानात उतरेल.  

पार्श्वभूमी

T20 World Cup 2024, IND vs SA :  भारत आणि दक्षिण आफ्रिका टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये विजेतेपदासाठी लढणार आहेत.  रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया वर्ल्ड कप फायनलसाठी सज्ज झाले आहेत. दुसरीकडे एडन मार्क्रमच्या नेतृत्त्वात  दक्षिण आफ्रिका देखील इतिहास रचण्यासठी सज्ज आहे.  भारत आणि दक्षिण आफ्रिका टी20 वर्ल्ड कपच्या फायनलच्या निमित्तानं आमने सामने येणार आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार ही मॅच रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.