LSWS 2022: रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये (Road Safety World Series) इंडिया लिजेंड्स (India Legends) आज त्यांचा शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. डेहराडूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत इंडिया लीजेंड्सनं आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यातील दोन सामन जिंकले आहेत. तर, दोन सामने पावसामुळे अनिर्णित ठरले आहेत. दुसरीकडं बांग्लादेशच्या संघाला (Bangladesh Legends) या स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात त्यांच्या पदरात निराशा पडलीय. 


भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) इंडिया लीजेंड्सच्या संघाचं नेतृत्व करत आहे. सचिननं आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये छोट्या पण दमदार खेळी केल्या आहेत. दरम्यान, सचिनच्या उत्कृष्ट शॉट सलेक्शनचंही दर्शन घडलं. त्यानं मागच्या सामन्यात 20 चेंडूत 40 धावा केल्या होत्या. यापुढील सामन्यातही सचिनकडून अशाच दमदार खेळीची चाहत्यांना अपेक्षा असेल. इंडिया लीजेंड्सच्या संघात सचिनसह सुरेश रैना (Suresh Raina), युवराज सिंह (Yuvraj Singh) आणि युसूफ पठाणही (Yusuf Pathan) आहेत. या सर्वांनी गेल्या सामन्यात आक्रमक अंदाजात फलंदाजी करत आपली भूमिका स्पष्ट केली. या सामन्यात युवराज आणि युसूफच्या बॅटीतून प्रत्येकी तीन-तीन षटकार झळकले. 


कधी, कुठे पाहणार सामना?
इंडिया लीजेंड्स आणि बांगलादेश लीजेंड्स यांच्यात आज रोड सेफ्टी सिरीजचा 18 वा सामना खेळला जाणार आहे. डेहराडूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. यापू्र्वी अर्धातास नाणेफेक होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सिनेप्लेक्स आणि स्पोर्ट्स-18 वाहिनीवर केलं जाईल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग व्हूट अॅपवर पाहता येणार आहे.


इंडिया लीजेंड्सचा संघ:
सचिन तेंडुलकर (कर्णधार), सुरेश रैना, युवराज सिंह, इरफान पठाण, युसूफ पठाण, हरभजन सिंह, मुनफ पटेल, सुब्रमण्यम बद्रीनाथ, स्टुअर्ट बिन्नी, नमन ओझा, मनप्रीत गोनी, प्रज्ञान ओझा, विनय कुमार, अभिमन्यू मिथुन, राजेश पवार, राहुल शर्मा.


हे देखील वाचा-