टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीत अफगाणिस्तानच्या संघाने स्कॉटलॅंडचा (Afghanistan v Scotland) पराभव करून विजयी सुरुवात केली आहे. शारजाह क्रिकेट स्टेडिअमवर (Sharjah Cricket Stadium) खेळण्यात आलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने स्कॉटलॅंडच्या संघाला तब्बल 130 धावांनी पराभूत केले. या सामन्यात मुजीब रेहमान (Mujeeb Rahman) आणि राशिद खान (Rashid Khan) फिरकीची जादू दिसली. या दोघांनी मिळून स्कॉटलॅंडचे 9 फलंदाज माघारी धाडले. ज्यामुळे अफगाणिस्तानच्या संघाला मोठ्या धावांनी विजय मिळवण्यात आला आहे.  


या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानचा निर्णय योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या संघाने 20 षटकात 4 विकेट्स गमावून 190 केल्या. पहिल्या विकेट्ससाठी मोहम्मद शहजाद आणि जजई यांनी 54 धावांची भागिदारी केली. अफगाणिस्तानने 82 धावांवर त्यांचा दुसरा विकेट्स गमावला. त्यानंतर मैदानात आलेल्या गुरबाज आणि नजीबुल्लाह यांनी संघ सावरला. अफगाणिस्तानची धावसंख्या 169 असताना संघाचा तिसरा विकेट्स गेला. त्यानंतर अखेरच्या ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मोहम्मद नबी आक्रमक फलंदाजी करीत 4 बॉलमध्ये 11 धावा केल्या. ज्यामुळे अफगाणिस्तानच्या संघाला 20 षटकात 190 धावा करता आल्या. स्कॉटलॅंडकडून शरीफला 2 विकेट्स मिळाल्या. 


अफगाणिस्तानच्या संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या स्कॉटलॅंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. मुजीब रहमानने 28 धावांवर स्कॉटलॅंडचे 3 फलंदाज तंबूत पाठवले. त्यानंतर स्कॉटलॅंडच्या एका पाठोपाठ विकेट्स गेले. अफगाणिस्तानकडून मुजीब रहमान आणि राशिद खानने आक्रमक गोलंदाजी केली. दरम्यान, मुजीब रहमानने 5 विकेट्स घेतल्या. तर, राशिद खानने 4 फलंदाजाला माघारी धाडले. 


पहिल्या सामन्यात विजय मिळवून अफगाणिस्तानच्या संघाने 'ब' गटाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. अफगाणिस्तानचा पुढील सामना पाकिस्तानसोबत 29 ऑक्टोबरला होणार आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचा संघ 3 नोव्हेंबरला भारताशी खेळणार आहे. 


संबंधित बातम्या- 


Mohammed Shami Abuse Update: सोशल मीडियावर ट्रोल झालेल्या शमीची आजी-माजी क्रिकेटपटूंकडून शमीची पाठराखण
IPL 2022: आयपीएलची रंगत आणखी वाढणार; पुढील हंगामात 'हे' दोन नवे संघ देणार धडक, नावे घ्या जाणून