टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2021) सुरुवात झाली असून येत्या 24 ऑक्टोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला पाहायला मिळणार आहे. या सामन्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या फॉर्मबात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. विराट कोहलीच्या (Virat Kohli) बॅटमधून गेल्या महिन्यांपासून एकही शतक पाहायला मिळाले नाही. परंतु, आयपीएलच्या चौदाव्या हंगामात विराट कोहलीने चांगले प्रदर्शन केले आहे. यामुळे टी-20 विश्वचषकातही विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा वर्षाव पाहायला मिळेल, अशी भारतीय क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा आहे. यावर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी रोड्सने (Jonty Rhodes) आपले मत व्यक्त केले आहेत. विराट कोहली हा माणूस आहे. मशीन नाही, असे वक्तव्य त्यांनी केली आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने गेल्या 10 वर्षात 115 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. भारताने यापैकी 73 सामने भारताने जिंकले आहेत. तर, 37 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. यातील 2 सामने टाय झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, विराट कोहलीच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने आतापर्यंत 63.5 टक्के विजय मिळवला आहे. यामुळे या विश्वचषकातही विराट कोहलीकडून अशीच कामगिरी पाहायला मिळेल, अशी भारतीय क्रिकेट चाहत्याची अपेक्षा आहेत.
जॉन्टी रोड्स काय म्हणाले?
सर्वांनाच विश्वचषकातील सामने पाहायला आवडतात. मात्र, प्रत्येक कर्णधाराची विश्वचषकावर नाव कोरण्याची इच्छा असते. विराट कोहलीही तोच विचार करीत आहे. त्यालाही विश्वचषक जिंकण्याची नक्कीच इच्छा असेल. दरम्यान, विराट कोहलीने धावा कराव्यात असे प्रत्येकाला वाटत आहे. परंतु, विराट कोहली माणूस आहे. मशीन नाही. मैदानात असताना विराट कोहलीची खेळी आपण पाहिली आहे. विराट कोहली कर्णधार आहे. आपल्याला शांत राहण्याची गरज आहे. त्याला त्याच्या पद्धतीने खेळू दिले पाहिजे, असे जॉन्टी रोड्स म्हणाले आहेत.
भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकिपर) इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरून चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दिपक चहर,
संबंधित बातम्या-