Shakib Al Hasan News: बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला मागे टाकून टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. रविवारी श्रीलंकेविरुद्ध सुपर 12 सामन्यात पथुम निसांकाला बाद करत शाकिबने ही कामगिरी केली. या सामन्यापूर्वी शाकिबने टी-20 विश्वचषकातील 28 सामन्यांत 39 विकेट घेतल्या होत्या. ओमानविरुद्ध नऊ धावा देऊन चार बळी घेणाऱ्या शाकिबने आधी निसांकाला बाद करून आफ्रिदीला मागे टाकलं आणि त्यानंतर अविष्का फर्नांडोच्या रूपाने त्याची 41वी विकेट घेतली. आफ्रिदीने 34 सामन्यात 39 विकेट घेतल्या. टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीतही शाकिब अव्वल आहे.


रविवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या ICC T20 विश्वचषकाच्या सुपर 12 मध्ये बांगलादेशने श्रीलंकेसमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले होते. बांगलादेशकडून मोहम्मद नईम आणि मुशफिकर रहीम यांनी चांगली फलंदाजी केली. या दरम्यान, नईमने 62 धावा केल्या तर रहीमने 57 धावांची नाबाद खेळी खेळली. दुसरीकडे, दुष्मंथा चमिरा श्रीलंकेसाठी चांगलाच महागात पडला. त्याने आपल्या 4 षटकात एकही विकेट न घेता 41 धावा दिल्या, तर चमिका करुणारत्नेने अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि 3 षटकात केवळ 12 धावा देऊन 1 बळी घेतला.





बांगलादेशचा पराभव 
T20 विश्वचषक 2021 मध्ये, शारजाह येथे बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सुपर 12 सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव केला. यासह 2014 च्या चॅम्पियन श्रीलंकेने 2021 च्या टी-20 विश्वचषकात विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. बांगलादेशने पहिल्यांदा खेळत 20 षटकांत 4 बाद 171 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेने पाच गडी गमावून सात चेंडू शिल्लक ठेवून लक्ष्याचा पाठलाग केला.