T20 WC 2021 : आयसीसी टी-20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आणि दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श हे दोघे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. मिशेल मार्शने या सामन्यात 50 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या आणि या विजयात मोठा वाटा उचलला. तो या अंतिम सामन्याचा 'मॅन ऑफ द मॅच' ठरला आहे. 


डेव्हिड वॉर्नर 'मॅन ऑफ द सीरिज'
डेव्हिड वॉर्नरने सात सामन्यात 289 धावा केल्या आहेत. त्याच्या धावांची सरासरी ही 48.16 इतकी आहे तर स्ट्राईक रेट हा 146.70 इतका आहे. डेव्हिड वॉर्नरने या टी-20 वर्ल्ड कपमध्ये तीन अर्धशतकं केली आहेत. आजच्या न्यूझीलंड विरोधातील अंतिम सामन्यात डेव्हिड वॉर्नरने 38 चेंडूत 53 धावा केल्या आहेत.  


 




ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कपवर नाव
आयसीसी टी-20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर 8 विकेट्सनं मात करीत विश्वचषक आपल्या नावावर केलाय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघाला प्रथम फलंदाजीची संधी दिली.  त्यानंतर न्यूझीलंडच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवलं. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या संघानं 18.5 षटकातच पूर्ण करून यंदाच्या विश्वचषकाचा खिताब जिंकला आहे. 


संबंधित बातम्या :