नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील टी 20 मालिका  27 जुलैपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि इतर सदस्य, प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी विचार विनिमय करुन टी 20 संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) दिलं आहे. भारत श्रीलंका दौऱ्यावर टी 20 मलिका आणि वनडे मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादवकडे टी 20 संघाचं नेतृत्व दिलं. मात्र, सूर्यकुमार यादवला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.



रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवीद्र जडेजा या तिघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.आता टी 20 टीमचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे देण्यात आलं. हार्दिक पांड्या याचं नाव देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत होतं. मात्र, सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली. सूर्यकुमार यादवला एकदिवसीय संघात मात्र संधी देण्यात आलेली नाही. 


सूर्यकुमार यादवला संघात का स्थान देण्यात आलेली नाही?


सूर्यकुमार यादवला एकदिवसीय सामन्यांमध्ये अनेकदा संधी देण्यात आली. मात्र,तो अपेक्षप्रमाणं कामगिरी करु शकला नाही. त्यामुळं निवड समिती दुसऱ्या नावांवर विचार करत असल्यानं त्याला डावललं असू शकतं. तर, सूर्यकुमार यादवला 2026 च्या टी 20 विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचा कॅप्टन म्हणून संधी देण्याचा निवड समितीचा विचार असू शकतो. टी 20 क्रिकेटमध्ये आयसीसीच्या रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे.  सूर्यकुमार यादवनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या फायनलमध्ये सूर्यानं चांगली फलंदाजी केली नाही. मात्र, डेव्हिड मिलरचा त्यानं घेतलेला कॅच गेमचेंजर ठरला. सूर्यकुमारनं घेतलेल्या कॅचनं भारताला 17 वर्षानंतर विजेतेपद मिळवून देण्यात मोठं यश मिळवलं. 


भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सूर्यकुमार यादवला अपेक्षेप्रमाणं दमदार कामगिरी करता आली नव्हती. सूर्यकुमार यादवनं 37 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 773 धावा केल्यात तर 4 अर्धशतकं लगावली आहेत. पाकिस्तानमधील चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारत केवळ 6 वनडे मॅच खेळणार आहे. त्यात सूर्यकुमारला संघाबाहेर करण्यात आलंय. त्यामुळं संघ निवड करताना निवड समितीनं दुसऱ्या पर्यायांवर देखील विचार केला असण्याची शक्यता आहे. 


 वनडे मालिकेसाटी टीम इंडिया 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर)ऋषभ पंत (विकेटकीपर),श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शधीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा


संबंधित बातम्या :


शतकवीर युवा खेळाडूंना संधी नाकारली, शशी थरुर निवड समितीवर भडकले, नेमकं काय घडलं?