ICC T20I Latest Rankings नवी दिल्ली: टी 20 वर्ल्ड कपपूर्वी भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव दोन अर्धशतकांच्या बळावर टी 20 रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. अभिषेक शर्मा  टी 20 रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. मात्र, त्याचं मोठं नुकसान झालं आहे. टॉप 5 रँकिंगमध्ये दोन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. याशिवाय इंग्लंडचे दोन आणि पाकिस्तानचा एक क्रिकेटपटू आहे. 

Continues below advertisement

सूर्यकुमार यादवची मोठी झेप

सूर्यकुमार यादवनं न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं. यामुळं टी 20 क्रमवारीत सूर्यकुमार यादव 12 व्या स्थानावरुन 5 स्थानांची प्रगती करुन 7 व्या स्थानावर पोहोचला आहे. सूर्यकुमार यादवचं रेटिंग 717 आहे. न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये आहे. सूर्यकुमार यादवनं दुसऱ्या सामन्यात 82 धावांची खेळी केली होती. तर, तिसऱ्या सामन्यात 57 धावांची खेळी केली होती.  

अभिषेक शर्मा पहिल्या स्थानावर कायम

भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्या स्थानावर कायम आहे. नव्या रँकिंगनुसार अभिषेक शर्माचं रेटिंग 929 इतकं आहे.  अभिषेक शर्माचं करिअर बेस्ट रेटिंग 931 इतकं आहे. म्हणजेच अभिषेक शर्माचं नुकसान झालं आहे. 

Continues below advertisement

रेटिंगमधील टॉप-5 फलंदाज

भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर इंग्लंडचा फिल सॉल्ट 849 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिलक वर्मा 781 रेटिंगसह तिसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडचा जोस बटलर 770 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान 763 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.

भारताचा संघ : 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उप-कर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, ईशान किशन (विकेटकीपर), रवि बिश्नोई.