India vs Sri Lanka, 3rd T20 : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) तिसऱ्या टी20 सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत तब्बल 228 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. सूर्यकुमार यादव याने तुफान फलंदाजी करत 51 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या आहेत. ज्यामुळे भारताची धावसंख्या 200 पार पोहोचली असून श्रीलंकेला आता विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 229 धावा करायच्या आहेत.
सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजचा सामना होणाऱ्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची खेळपट्टी सपाट आहे, फलंदाजीसाठी उपयुक्त असल्याने प्रथम फलंदाजी करुन एक मोठी धावसंख्या उभारण्याचा भारताचा प्लॅन होता. जो भारतीय फलंदाजानी योग्यपणे सत्यात उतरवत तब्बल 228 धावा 20 षटकात केल्या. यावेळी सर्वोत्कृष्ट खेळी स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने केली. 51 चेंडूत 9 षटकार 7 चौकार ठोकत सूर्याने नाबाद 112 धावा केल्या. सलामीवीर ईशान किशन 1 धाव करुन बाद झाल्यावर राहुल त्रिपाठीने छोटी पण स्फोटक खेळी केली. 35 धावा करुन तो बाद झाला. मग सूर्या आणि गिलने डाव सावरला. गिल 46 धावा करुन बाद झाला. मग पांड्या आणि हुडा स्वस्तात बाद झाले. अक्षरच्या नाबाद 21 धावांनी भारताची धावसंख्या 228 पर्यंत नेली. ज्यानंतर श्रीलंकेचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.
कशी आहे टीम इंडिया?
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल
कसा आहे श्रीलंकेचा संघ?
पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकिपर), धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, अविष्का फर्नांडो, दासुन शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दिलशान मदुशंका
हे देखील वाचा-