India vs Sri lanka, 3rd T20 : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सध्या टी-20 मालिका खेळवली जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक-एक सामना जिंकत बरोबरीत आहेत. आता आज मालिकेतील निर्णायक सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर (Saurashtra cricket stadium) होणार आहे. दरम्यान आजचा सामना अखेरचा आणि निर्णायक असल्याने या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी (Pitch Report) कशी आहे अर्थात पिच रिपोर्ट जाणून घेऊ... 


राजकोटमध्ये खेळल्या जाणाऱ्या आजच्या सामन्यातील खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण ही सपाट खेळपट्टी गोलंदाजांसाठी अडचणी निर्माण करते. फलंदाजांना येथे फलंदाजी करणे खूप सोपे जाईल. तसंट, गोलंदाजांना योग्य लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करणं अनिवार्य असणार आहे. आजची खेळपट्टी फलंदाजांना पूर्णपणे साथ देणारी आहे. सपाट खेळपट्टीसह येथील चौकार ही लहान असल्याने फलंदाजांसाठी अधिक उपयुक्त ठरतील. सीमारेषेची लांबी सुमारे 65-70 मीटर असेल. या खेळपट्टीनुसार आज एक मोठा स्कोअर उभा राहून हायस्कोरिंग सामना पाहायला मिळेल.


राजकोटमध्ये भारताचा रेकॉर्ड कसा?


भारताने आतापर्यंत राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर चार आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. यादरम्यान तीन सामने जिंकले. एका सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. टीम इंडियाने आपला पहिला T20 सामना ऑक्टोबर 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवला. यानंतर दुसरा सामना नोव्हेंबर 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला गेला. या सामन्यात भारताला 40 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. टीम इंडियाने 2019 आणि 2022 मध्ये सामने जिंकले होते. त्याने बांगलादेशचा 8 विकेट्सने तर दक्षिण आफ्रिकेचा 82 धावांनी पराभव केला. आता टीम इंडियाचा सामना राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. श्रीलंकेचा संघ प्रथमच या मैदानावर सामना खेळणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील हा सामना निर्णायक ठरणार आहे.


आजचा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार


भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर झाला. रोमहर्षक सामन्यात भारताने अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला. पण दुसऱ्या सामन्यात पुण्याच्या एमसीए मैदानात श्रीलंकेचा संघ 16 धावांनी जिंकला. ज्यामुळे दोन्ही संघानी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता आजचा सामना जिंकणारा संघ मालिकाही 2-1 ने जिंकणार आहे.  


हे देखील वाचा-