South Africa vs West Indies Test Match : कसोटी क्रिकेटमध्ये अनेकदा विक्रम होतात आणि मोडले जातात. अनेक विक्रम हे खेळाडू किंवा संघासाठी उपलब्धी ठरतात, तर असे अनेक लाजिरवाणे विक्रम देखील आहेत जे खेळाडू किंवा संघाच्या नावावर अनिच्छेनेही नोंदवले जातात. 


कोणत्याही खेळाडूला किंवा संघाला कोणत्याही किंमतीत हा लज्जास्पद विक्रम करणे टाळायचे असते, परंतु तसे करणे सोपे नाही. नुकतीच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका खेळली गेली. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजवर 40 धावांनी विजय मिळवला. पण 11 फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतल्यामुळे या सामन्याची इतिहासाच्या पानात नोंद झाली.  


11 फलंदाज शून्यावर आऊट


गुयाना येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण संघ 160 धावांवर ऑलआऊट झाला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचे 4 फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर वेस्ट इंडिजचा पहिला डाव सुरू झाला आणि त्यांची अवस्था आणखी बिकट झाली. यजमान संघ 144 धावांत गारद झाला. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात 3 फलंदाज शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले.


त्यानंतर दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने स्कोअरबोर्डवर 246 धावा केल्या. यामध्ये त्यांचे 3 फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ 263 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. पण 40 धावांनी तो कमी पडला. दुसऱ्या डावात त्यांचा एक फलंदाज शून्यावर बाद झाला. अशाप्रकारे, संपूर्ण सामन्यात 11 खेळाडू शून्यावर बाद झाले, ज्यात दक्षिण आफ्रिकेचे 7 आणि वेस्ट इंडिजचे 4 फलंदाज होते.


तरीही मोडला नाही विश्वविक्रम


आम्ही तुम्हाला सांगतो की एका कसोटीत 11 फलंदाज शून्यावर आऊट झाल्यानंतरही विश्वविक्रम मोडता आला नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कसोटी क्रिकेटमध्ये असे 14 वेळा घडले आहे. जेव्हा एका कसोटीदरम्यान 11 फलंदाज शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. 1888 मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात पहिल्यांदाच हा लज्जास्पद विक्रम झाला होता. जो आजही कोणी मोडला नाही.



संबंधित बातमी :


Vinesh Phogat Video : विनेश फोगाटची प्रकृती खालावली अन् अचानक पडली बेशुद्ध...; कार्यक्रमादरम्यान मग काय घडलं?

Mohammed Shami : मोठी अपडेट! बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय स्टार खेळाडू बाहेर?

Shreyas Iyer : श्रेयस अय्यरने रस्त्यावरच्या गरीब महिलेला कितीची नोट काढून दिली? बघा VIDEO