SA vs AUS Semi Final Highlights : विश्वचषकाच्या महायुद्धात रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
SA vs AUS LIVE Score: भारतीय संघानं न्यूझीलंडचं आव्हान 70 धावांनी मोडीत काढून विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. विश्वचषकाची ही फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
ऑस्ट्रेलियाचा फायनलमध्ये प्रवेश
जोश इंग्लिंशला बाद करत कोटत्जेनं दिला मोठा धक्का
स्मिथच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसलाय. स्मिथ मोक्याच्या क्षणी 30 धावा काढून बाद झालाय. आता सर्व मदार जोश इंग्लिश याच्यावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतलाय. ग्लेन मॅक्सवेल स्वस्तात बाद झाला.. कांरारुची सर्व मदार स्मिथवर
मार्नस लाबुशेन बाद झाला. ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का... लाबुशेन 18 धावा काढून बाद झालाय
केशव महाराजने ट्रेविस हेडचा त्रिफाळा उडवला... ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का
ट्रेविस हेडचे अर्धशतक... ऑस्ट्रेलियाची विजयाकडे वाटचाल
मिचेल मार्श गोल्डन डकचा शिकार..... रबाडाच्या गोलंदाजीवर मार्श बाद.... डुसेनचा अप्रतिम झेल
एडन मार्करमने डेविड वॉर्नरला दाखवला तंबूचा रस्ता... 60 धावांवर ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट....
आफ्रिकेने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने वादळी सुरुवात केली. पाच षटकात बिनाबाद 50 धावा केल्यात..... वॉर्नर अन् हेड यांच्याकडून फटकेबाजी
212 धावांवर आफ्रिकेचा डाव आटोपला
डेविड मिलर शतकानंतर बाद झाला.... 115 चेंडूत 101 धावांची खेळी केली. आफ्रिकेला नववा धक्का
डेविड मिलरने एकाकी झुंज देत शतक ठोकले. मिलरच्या शतकी खेळीमुळे आफ्रिका सन्मानजक धावसंख्यापर्यंत पोहचलाय.
गॅराल्ड कोएत्ज़ी याला बाद करत कमिन्सने आफ्रिकाला सातवा धक्का दिला.
डेविड मिलरची एकाकी झुंज... अर्धशतक ठोकले... आफ्रिका सहा बाद 134 धावा
ट्रेविस हेडने आफ्रिकेला लागोपाठ दोन धक्के दिले. हेनरिक क्लासेन आणि मार्को यान्सन यांना पाठवले तंबूत
डेविड मिलर आणि हेनरिक क्लासेन यांनी आफ्रिकेचा डाव सावरला आहे. आफ्रिका चार बाद 108 धावा.. डेविड मिलर 47 धावांवर खेळत आहे.
पावसाच्या विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात झाली आहे. मिलर आणि क्लासेन मैदानावर
थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार
ईडन गार्डनवर पावसाला सुरुवात झाली
वान डर डुसेन स्वस्त बाद झालाय. सहा धावांर डुसेन बाद झालाय. 24 धावांवर चार गडी तंबूत
एडन मार्करमही स्वस्तात तंबूत परतलाय.. सामन्यावर ऑस्ट्रेलियाने पकड मिळवली आहे. मार्करम फक्त 10 धावा काढून तंबूत परताय.. आफ्रिका तीन बाद 23 धावा
फॉर्मात असेला क्विंटन डिकॉक फक्त तीन धावा काढून तंबूत परतलाय. आफ्रिकेची हराकिरी सुरुच आहे.
मिचेल स्टार्कने आफ्रिकेला पहिला धक्का दिला. टेम्बा बवुमाला स्टार्कने शून्यावर तंबूत पाठवलेय.
डेविड वार्नर, ट्रेविस हेड, मिशेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, पॅट कमिंस (कर्णधार), एडम झम्पा आणि जोश हेजलवूड
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी वान डेर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, मार्को यॉन्सेन, गॅराल्ड कोएत्ज़ी, केशव महाराज, कगीसो रबाडा, तरबेज शम्सी
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे.
थोड्याच वेळात होणार नाणेफेक
पार्श्वभूमी
South Africa vs Australia Semi Final LIVE Score : रोहित शर्माच्या भारतीय संघानं न्यूझीलंडचं आव्हान 70 धावांनी मोडीत काढून विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. विश्वचषकाची ही फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. आणि फायनलच्या रणांगणात भारतीय संघाचा मुकाबला कोणत्या संघाशी होणार याचा फैसला आज कोलकात्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन बलाढ्य संघांमध्ये होणार आहे. विश्वचषकाच्या साखळीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांनी नऊपैकी सात सामने जिंकून, प्रत्येकी 14 गुणांची कमाई केली होती. पण नेट रनरेटच्या निकषावर दक्षिण आफ्रिकेनं गुणतालिकेत दुसरा आणि ऑस्ट्रेलियानं तिसरा क्रमांक पटकावला होता. पण उभय संघांमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी धुव्वा उडवला होता.
विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणार आहे. दक्षिण आफ्रिका संघ गुणतालिकेत दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. ईडन गार्डन्स मैदानावर होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड मानले जातेय. डेविड वॉर्नर, मॅक्सवेल, मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड सध्या भन्नाट फॉर्मात आहेत. त्याशिवाय गोलंदाजीत पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सच्या जोडीला एॅडम झम्पा आहे. दुसरीकडे आफ्रिकाच्या संघामध्ये सातत्य दिसत नाही. क्विंटन डिकॉक फॉर्मात आहे. पण त्याला इतर फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळत नाही. एडन मार्करम, हेनरिक क्लासेन यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. गोलंदाजीतही कगीसो रबाडा, लुंगी एनगिडी यांच्या कामगिरीत सातत्य नाही.
पाऊस खोडा घालणार का ?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाचा कोणताही अंदाज नाही. पण ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोलकात्याचे तापमान 23 ते 25 डिग्री सेल्सियस इतके राहू शकते.
खेळपट्टी कशी, फलंदाजाची मौज की गोलंदाजाचे वर्चस्व?
कधी अन् कुठे पाहाल सामना ?
विश्वचषकातील दुसरा सेमीफायनलचा सामना गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिाक आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्ड्न मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. 16 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता या दोन संघामध्ये लढत होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल. स्टार स्पोर्ट्सवर हा सामना लाईव्ह पाहू शकतात.मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार या अॅपवर हा सामना मोफत पाहता येईल.
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेंबा बावुमा (कर्णधार), रासी वान डेर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, मार्को यॉन्सेन, गॅराल्ड कोएत्ज़ी, केशव महाराज, कगीसो रबाडा, लुंगी एनगिडी
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -
डेविड वार्नर, ट्रेविस हेड, मिशेल मार्श, स्टीव स्मिथ, जोश इंगलिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मिशेल स्टार्क, पॅट कमिंस (कर्णधार), एडम झम्पा आणि जोश हेजलवूड
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -