Shubman Gill-Sara Tendulkar Video Viral : टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण अफवा नाही तर एक व्हायरल व्हिडिओ आहे. 8 जुलै रोजी लंडनमध्ये युवराज सिंगच्या कर्करोग फाउंडेशन YouWeCan साठी एका चॅरिटी डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये ब्रायन लारा, केविन पीटरसन, विराट कोहली आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि सर्व खेळाडू असे जगभरातील क्रिकेट दिग्गज उपस्थित होते.

सारा तेंडुलकर पण या कार्यक्रमात आली होती. ती तिचे वडील सचिन आणि आई अंजली तेंडुलकरसह दिसली. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने देखील संघासोबत या कार्यक्रमासाठी हजेरी लावली.

साराने टीम इंडियाचा व्हिडिओ केला रेकॉर्ड...

या पार्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचे सर्व खेळाडू कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असताना लोक टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करत आहे. यादरम्यान, सारा तेंडुलकर व्हिडिओ बनवतात दिसली, परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे साराने कॅमेरा चालू केला तोपर्यंत शुभमन गिल तिथून निघून गेला होता. व्हिडिओवरून हे स्पष्ट होते की गिल खेळाडूंपेक्षा थोडे पुढे चालत होता आणि साराचा कॅमेरा उशिरा चालू झाला. पण, साराने उर्वरित खेळाडूंचा व्हिडिओ बनवला.

दरम्यान, सोशल मीडियावर अजून एक व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये भारतीय कर्णधार हसताना दिसत आहे, सारा तेंडुलकर त्याच्या समोर बसलेली आहे. हा फोटो गिल संघासोबत जेवणासाठी पोहोचला तेव्हाचा आहे आणि सारा आधीच तिथे उपस्थित होती. सारा तेंडुलकरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या कार्यक्रमाचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या मित्रांसोबत दिसत आहे.

अफेअरच्या अफवांनी रंगवली चर्चा 

शुभमन गिलचे नाव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरशी अनेक वेळा जोडले गेले आहे. एकेकाळी त्यांच्या अफेअरच्या अफवा चर्चेत होत्या. दोघेही पूर्वी सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत होते. त्याच वेळी, ते एकमेकांच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट देखील करत होते. पण, शुभमन आणि सारा यांनी या अफवांवर कधीही उघडपणे काहीही सांगितले नाही. पण लंडनमधील या पार्टीने पुन्हा एकदा या अफवांना हवा दिली आहे.

हे ही वाचा -

Radhika Yadav News : कोण होती टेनिसपटू राधिका यादव? जिला राहत्या घरात वडिलांनीच झाडल्या गोळ्या, कारण पण धक्कादायक