Vaibhav Suryavanshi Craze In England:इंग्लंडमध्ये एक दृश्य घडले, असे की जणू कुठल्या रोमॅंटिक सिनेमातलाच एखादा सीन. वय केवळ 14 पण फॅनफॉलोविंग आणि क्रेझ अशा की मोठमोठ्या कलाकारांनाही हेवा वाटावा. हो, आपण बोलतोय वैभव सूर्यवंशीबद्दल. अवघ्या 14 व्या वर्षी वैभव सूर्यवंशी भारताचा स्टार फलंदाजबनला आहे. सध्या तो इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या युवा मालिकेसाठी भारतीय अंडर-19 संघाचा भाग आहे, परंतु त्याची क्रेज सतत वाढत आहे. या फलंदाजाने इंग्लंड अंडर-19 संघाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत अनेक विक्रम मोडले.

आयपीएल 2025 मधील त्याच्या पहिल्या हंगामात या फलंदाजाने सर्वात तुफानी शतक ठोकून प्रसिद्धी देखील मिळवली. पण, आता तो केवळ भारतातच नाही तर जागतिक स्टार बनला आहे आणि याचा पुरावा म्हणजे इंग्लंड दौऱ्यावर, दोन मुलींनी त्याला भेटण्यासाठी सहा तास कारने प्रवास केला.सहा तास गाडी चालवायचे कारण म्हणजे वैभवची एक झलक पाहायची होती. आयपीएलमधील वैभवची फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने याचा एक फोटो शेअर केला आहे.

वैभव सूर्यवंशीला भेटण्यासाठी दोन मुलींचा 6 तास गाडीचा प्रवास!

राजस्थान रॉयल्सच्या ट्विटनुसार, अन्या आणि रिवा नावाच्या या दोन मुली सहा तास गाडी चालवून वैभवची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी वॉर्सेस्टरला पोहोचल्या. दोन्ही मुली राजस्थान रॉयल्सच्या जर्सी घालून आल्या होत्या. राजस्थानने त्याचा फोटो शेअर करत लिहिले की, 'आमचे चाहते सर्वोत्तम आहेत याचा हा पुरावा आहे.' राजस्थानने लिहिले की, दोन्ही मुलींसाठी हा दिवस संस्मरणीय होता.

भारताने इंग्लंडचा 3-2 असा केला पराभव 

भारतीय अंडर-19 संघाने इंग्लंडच्या अंडर-19 संघाचा पराभव केला आणि पाच सामन्यांची युवा एकदिवसीय मालिका 3-2 अशी जिंकली. धावा काढण्यापासून ते विकेट घेण्यापर्यंत, भारतीयांनी युवा एकदिवसीय मालिकेत वर्चस्व गाजवले. वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक धावा केल्या तर कनिष्क चौहानने सर्वाधिक विकेट घेतल्या.

या मालिकेत वैभवने अनेक वादळी डाव खेळले. त्याने पाचही सामन्यांमध्ये खेळला आणि पाच डावांमध्ये 71.00 च्या सरासरीने आणि 174.02 च्या स्ट्राईक रेटने 355 धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे.

हे ही वाचा -

Eng vs Ind 3rd Test : दोन दिवसांपूर्वीचं गवत अचानक गायब; इंग्लंडने अचानक बदलली लॉर्ड्सची खेळपट्टी, भारताचं गणित बिघडणार? फोटो व्हायरल