IND vs AUS 3rd Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु झाला असून पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) आमने-सामने आले आहेत. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी निवडली असून एक मोठी धावसंख्या करुन कांगारुंवर दबाव आणण्याचा भारताचा डाव आहे. विशेष म्हणजे या सामन्यात भारताने फॉर्मात असणाऱ्या शुभमनन गिलला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली असून फ्लॉप कामगिरी करणाऱ्या केएल राहुलला बाहेर बसवलं आहे. तसंच गोलंदाजीतही एक बदल करत मोहम्मद शमीच्या जागी उमेश यादवला प्लेईंग 11 मध्ये घेतलं आहे. 


दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यानं संघात पुनरागमन केलं असून युवा अष्टपैलू कॅमेरुन ग्रीनही दुखापतीतून सावरल्याने अंतिम 11 मध्ये आहे. या दोघांनी पॅट कमिन्स आणि डेव्हिड वॉर्नर या दोघांची जागा घेतली आहे. तर नेमकी दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे पाहूया...


दोन्ही संघाची प्लेईंग 11


भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.


ऑस्ट्रेलिया- उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनेमन




कुठे पाहता येणार सामना?






भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   






भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Head to Head


भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 104 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 32 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 43 सामने जिंकले आहेत. याशिवाय 28 सामने ड्रॉ झाले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे. 


WTC Final मध्ये एन्ट्रीची भारताला संधी


यामालिकेत एकूण 4 कसोटी सामने खेळवले जाणार होते, ज्यातील पहिला आणि दुसरा सामना भारताने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरी कसोटी जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करु शकतो. 


हे देखील वाचा-