India vs England Rajkot : रवींद्र जाडेजा, केएल राहुल हे दुखापतीमुळे आधीच जायबंदी आहेत. त्यात विराट कोहली कौटंबिक कारणामुळे ब्रेकवर आहे. त्यामुळे भारतीय संघाची कसोटी मालिकेत फलंदाजी ढेपाळल्याचं दिसलं. आता यात भर म्हणून श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याचं समोर आलेय. याबाबत इंडियन एक्स्प्रेसनं वृत्त दिले आहे. बीसीसीआयकडून अय्यरबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. राजकोट कसोटी मालिकेतून श्रेयस अय्यर बाहेर जाण्याची शक्यता आहे. 15 फेब्रुवारी रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्याची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. उर्वरित तीन कसोटी मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे.
'इंडियन एक्स्प्रेस' च्या वृत्तनुसार, युवा फलंदाज श्रेयस अय्यर याने टीम इंडियाच्या मेडिकल स्टाफसोबत दुखापतीबाबत चर्चा केली आहे. श्रेयस अय्यरला पाठदुखीचा त्रास होोय. त्याशिवाय जास्त काळ मैदानावर असल्यास पायाच्या मांड्या दुखण्याचाही त्रास होतो. श्रेयस अय्यरला फॉरवर्ड डिफेन्सवर फलंदाजी करताना जास्त त्रास होतो. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून अय्यरला आराम दिला जाऊ शकतो.
दरम्यान, युवा फलंदाज श्रेयस अय्यर याला गेल्यावर्षी दुखापत झाली होती. त्यावेळी सर्जरी करण्यात आली होती. मोठ्या कालावधीनंतर श्रेयस अय्यर याने क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक केले होते. आता पुन्हा एकदा अय्यरला दुखापत झाली आहे. अय्यरला बेंगलोरमध्ये एनसीएमध्ये पाठवण्यात येऊ शकते. अय्यर संघाबाहेर गेला तर त्याच्याजागी युवा खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे. केएल राहुल आणि रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी मालिकेला मुकले होते. केएल राहुलचं संघात कमबॅक होण्याची शक्यता आहे. तर रवींद्र जाडेजाला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक -
पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम) - इंग्लंडचा विजय
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम) - भारताचा विजय
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)